गुरमीत साकारणार महाराणा प्रताप | पुढारी

गुरमीत साकारणार महाराणा प्रताप

गुरमीत चौधरी त्याच्या आगामी वेब सीरिज ‘महाराणा’मध्ये महाराणा प्रताप यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. निर्मात्यांनी नुकताचा मालिकेचा पहिला टीझर रिलीज केला. त्यात गुरमीत वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. गुरमीतने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर सीरिजचा टीझर शेअर करत लिहिले आहे की, ‘हृदयात महादेव, रणात महावीर.. पाहा महाराणा प्रताप यांच्या असीम बहादुरी कथा.’ माध्यमांशी बोलताना गुरमीत म्हणाला, महाराणा प्रताप हे त्यांच्या साहस आणि शौर्यासाठी ओळखले जातात. त्यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यामुळे मी हा माझा मोठा सन्मान समजतो. नितीन चंद्रकांत देसाई यांनी मला या सीरिजमध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मला मानलेच पाहिजेत. कारण, या वेब सीरिजचे दिग्दर्शन नितीन देसाई हेच करणार आहेत.

Back to top button