आदित्य रॉय कपूरला अचानक मारली मिठी, जबरदस्तीने किसही…(Video) | पुढारी

आदित्य रॉय कपूरला अचानक मारली मिठी, जबरदस्तीने किसही...(Video)

‘आशिकी 2’ चित्रपटामुळे चर्चेत आलेला अभिनेता आदित्य रॉय कपूर सध्या अनन्या पांडेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची गरमागरम चर्चा बॉलीवूडमध्ये आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. अलीकडेच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या मुंबईत झालेल्या रिसेप्शन पार्टीतही तो अनन्यासोबत दिसला होता. त्याने 2009 मध्ये ‘लंडन ड्रीम’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मध्यंतरी तो कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसला नाही. बर्‍याच काळानंतर आता तो ओटीटीवर दिसणार आहे. दरम्यान, त्याच्याबाबतीत नुकताच एक विचित्र प्रसंग घडला. त्याचे झाले असे की, मुंबईत ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजचे स्क्रिनिंग आटोपल्यानंतर आदित्य चित्रपटगृहातून बाहेर पडत होता. त्याचवेळी एका चाहतीने त्याला मिठी मारली. एवढेच नव्हे तर त्याला जबरदस्तीने किससुद्धा केले. त्यामुळे आदित्य पुरता गोंधळून गेला. याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. त्यावर एका यूजरने प्रतिक्रिया व्यक्त करताना लिहिले आहे की, आंटी कंट्रोल…

(video- varindertchawla insta वरून साभार)

Back to top button