मकरंद अनासपुरे घेऊन येतायेत धम्माल विनोदी ‘वऱ्हाडी वाजंत्री’ | पुढारी

मकरंद अनासपुरे घेऊन येतायेत धम्माल विनोदी 'वऱ्हाडी वाजंत्री'

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळी संपताच वेध लागतात ते लग्न सराईचे. यंदाची लग्नसराई आपल्या सर्वांसाठी विशेष असणार आहे. सर्वांचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरे आणि मिश्कील विनोदाचा शहनशहा विजय पाटकर वाजंत्र्यांसोबत सगळ्या वऱ्हाडाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांनी या सोहळ्याचा घाट घातला आहे. फुल्ल मनोरंजनाची ट्रीट देण्यासाठी ते स्वराज फिल्म प्रॉडक्शन निर्मित मल्टीस्टारर “वऱ्हाडी वाजंत्री” हा चित्रपट घेऊन या लग्न सराईत अवतरणार आहेत. भरगच्च मनोरंजन असलेल्या या चित्रपटाची अधिकृत घोषणा मोशन पोस्टरद्वारे सोशल मीडियावर करण्यात आली आहे.

कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्या स्वराज फिल्म प्रॉडक्शनची निर्मिती आहे. लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर यांचे दिग्दर्शन आहे. विजय पाटकर रसिकांसाठी विनोदाचा हा बंपर आहेर घेऊन उभे आहेत. मकरंद अनासपुरे, पॅडी कांबळे, हेमांगी कवी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहे.

वैभव अर्जुन परब लिखित “वऱ्हाडी वाजंत्री” या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या मकरंद अनासपुरेंसोबत जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, रीमा लागू, पंढरीनाथ कांबळी, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, राजेश चिटणीस, प्रशांत तपस्वी, विनीत बोंडे, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे इत्यादी कलाकार आहेत. या चित्रपटाला अविनाश विश्वजित, शशांक पोवार यांनी संगीत दिले आहे. गीतकार राजेश बामगुडे यांच्या गाण्यांना गायक आदर्श शिंदे, आनंदी जोशी, मैथिली पानसे-जोशी, स्व. नंदू भेंडे, गणेश चंदनशिवे यांनी स्वरसाज चढवला आहे. नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव, राजेश बिडवे यांनी केले आहे.

या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद लेखन वैभव अर्जुन परब यांनी लिहिले आहेत. छायाचित्रण शैलेश अवस्थी यांचे असून संकलक स्व. सलोनी कुलकर्णी, हेमंत गायकवाड आहेत. कला दिग्दर्शक गिरीश कोळपकर असून वेशभूषा गीता गोडबोले, पोर्णिमा ओक यांनी केली आहे. तर कार्यकारी निर्माता इंदुराव कोडले-पाटील आहेत.

हेही वाचा : 

Back to top button