बेळगाव : एटीएममधून रक्कम काढणाऱ्यांची फसवणूक, भामट्याला अटक

आरोपी अमोल सटके व त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले एटीएम कार्ड
आरोपी अमोल सटके व त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले एटीएम कार्ड
Published on
Updated on

अंकली (जि. बेळगाव) : पुढारी वृत्तसेवा – एटीएममधून रक्कम काढणाऱ्या ग्राहकांना मदत करण्याच्या निमित्ताने त्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक करण्यात आलीय. ग्राहकांचे एटीएम घेऊन त्यांच्या खात्यावरील रक्कम काढून फसवणाऱ्याला चिक्कोडी पोलिसांनी अटक केली. अमोल दिलीप सकटे (वय ३० रा. सावर्डे, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत चिकोडी पोलीस स्थानकातून समजलेली माहिती अशी की, हालटी तालुका चिकोडी येथील रहिवाशी विजया दाणापा ढाले या चिकोडी येथील एटीएममधून रक्कम काढण्यासाठी आल्या होत्या.  भामटा अमोल सकटे त्याने त्यांचे एटीएम कार्ड बदलले. ढाले यांना दुसरे बनावट एटीएम देऊन त्यांच्या खात्यावरील सुमारे ३७ हजार ५०० रुपये काढले. ढाले यांची फसवणूक झाल्याबद्दलचा गुन्हा चिकोडी पोलीस स्थानकात ३ सप्टेंबर महिन्यात दाखल केला होता.

भामट्याकडे सापडली  ५१ बनावट एटीएम कार्ड

या घटनेबद्दल चिकोडी पोलिसांनी चिकोडी उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज एल्गार, सीपीआय आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चौकशी केली. भामटा अमोल सकटे याच्याकडे  ५१ बनावट एटीएम कार्ड मिळाले. या भामट्याने निपाणी, चिकोडी, रायबाग, अथणी, गोकाक, बेळगाव, विजापूर, बागलकोट व महाराष्ट्रात फसवल्याचे प्रकरण उघडकीस आले.

याप्रकरणी चिकोडी पोलीस स्थानकाचे फौजदार यमनाप्पा मांग, कर्मचारी आर एल शिळांनवर, एम पी सत्तेगेरी, एस पी गलगली यांनी भामट्याला पकडण्यासाठी सहकार्य केले. या कामगिरीबद्दल बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी चिकोडी पोलिसांचे कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news