स्टार प्रवाहच्या या कलाकारांसोबत गणपती बाप्पाचं होणार आगमन

गणपती उत्सव
गणपती उत्सव
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचंच लाडकं दैवत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आपण बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसतो. भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात. बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत.

अधिक वाचा-

बाप्पांचं आगमन रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्याने आसमंत दरवळून टाकतो. यासाठी पुजाविधीच्या सामग्रीने बाजारपेठा सजल्या आहेत.

अधिक वाचा-

बाप्पाच्या आगमनासाठी तुम्ही आम्ही उत्सुक आहात ना. मग, यात स्टार प्रवाहचा परिवार कसा बरं मागे राहील. लाडक्या गणरायाचं स्वागत स्टार प्रवाहचे कलाकार अगदी जल्लोषात करणार आहेत. स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण स्टार प्रवाह परिवार एकत्र येणार आहे.

त्यामुळे गणेशोत्सवाची रंगत द्विगुणीत होणार यात शंका नाही. ढोल-ताश्यांच्या गजरात बाप्पाचं स्वागत ते अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं पार पडणार आहे.

सणासुदीचे दिवस म्हटले तर आपले पारंपरिक खेळही ओघाने आलेच. स्टार प्रवाहच्या मालिकांमधल्या तुमच्या आवडीच्या सासू-सुनांच्या जोड्या मंगळागौरीचे खास खेळ खेळणार आहेत. त्यामुळे मनोरंजनाने परिपूर्ण असा विशेष कार्यक्रम असेल.

अधिक वाचा-

स्टार प्रवाह परिवाराचा गणेश बाप्पा असल्यामुळे या परिवाराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. प्रेक्षकांनाही या कार्यक्रमाचं खास निमंत्रण आहे.

रविवार १२ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजल्यापासून प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येईल. तेव्हा पाहायला विसरु नका १२ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह परिवार गणशोत्सव २०२१.

हेदखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news