‘लायगर’वरही बहिष्काराचा ट्रेंड | पुढारी

‘लायगर’वरही बहिष्काराचा ट्रेंड

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा चित्रपट ‘लायगर’ या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. सध्या दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत; पण आता ‘लाल सिंग चढ्ढा’ पाठोपाठ या चित्रपटावरही बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याचे कारणही आमिरचा चित्रपटच ठरला आहे. एका मुलाखतीत विजयला ‘लाल सिंग चढ्ढा’च्या बॉयकॉटबाबत विचारले असता तो म्हणाला, ‘आमिर खान यांच्या एका चित्रपटामुळे दोन ते तीन हजार कुटुंबे जोडलेली असतात.

एका चित्रपटावर बहिष्कार टाकल्याने केवळ आमिरला काही फरक पडत नाही; पण त्या हजारो कुटुंबांवर परिणाम होऊ शकतो. ज्यांचा रोजगार जातो.’ विजयच्या या वक्तव्यानंतर काहींनी त्याचेही ट्रोलिंग सुरू केले आहे. त्यातूनच ‘लायगर’ला बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.

Back to top button