Rakul Preet : रेड मिरची 🌶❤️; रकुलचा रेड डीप नेकमध्ये कातिलाना अदांज | पुढारी

Rakul Preet : रेड मिरची 🌶❤️; रकुलचा रेड डीप नेकमध्ये कातिलाना अदांज

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड चित्रपटांत दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ( Rakul Preet Singh ) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या तिच्या रेड रंगाच्या डीप नेकलाइन आउटफिटने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. रकुलच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेन्टससोबत ईमोजीचा पाऊस पाडला आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने ( Rakul Preet Singh ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर लाल रंगांच्या मिनी शार्ट ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. रेड डीप नेकलाइन आउटफिटमधील या फोटोत तिचा कातिलाना अंदाज चाहत्यांना पाहायला मिळत आहे. हे फोटो खूपच ठळक दिसत आहेत. या ड्रेसवर तिने त्याच रंगाचे म्हणजे, लाल रंगाचे ब्लेझर परिधान करून चारचॉद लावले आहेत. मोकळे केस, एलिगेंट मेकअप, लिपस्टिक आणि सिंपल इयररिंग्सने रकुलच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. या फोटोत रकुल खूपच क्यूट आणि ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोला तिने लंवगी मिरची आणि हार्ट ईमोजी कॅप्शनमध्ये लिहिली आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने ‘Beautiful ❤️’, ‘So cute 🥰’,’ red mirch’, ‘Super’, ‘Wow’, ‘Gorgeous ❤❤💖❤❤’, ‘Wow so hot 🔥❤️’, ‘Wooaahhh…’, ‘sizzling hot ❤️🔥’, ‘ख़ूबसूरत…🔥’, ‘So sweet ♥️’, ‘Looking Gorgeous ❤️😍’, ‘Very nice and beautiful’, ‘Pretty 🔥🔥’, ‘Dream girl❤️’,’A Red Rose 🌹’, ‘हे फोटो पाहातच रहावे असे वाटते’ आणि ‘कहीं प्यार ना हो जाये… ‘. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी रकुलच्या फोटोवर हार्ट आणि फायरच्या ईमोजीचा पाऊस पाडला आहे. रकुलचे सोशल मीडियावर फॅन फॉलोव्हर्स जबरदस्त आहे.

रकुल प्रीतने तिच्या अभिनय करिअरची सुरुवात ‘गिल्ली’ चित्रपटातून केली होती. यानंतर तिने ‘यारियां’, ‘मिशन सिंड्रेला’, ‘डॉक्टर जी’, ‘थँक गॉड’, ‘छत्रीवाली’ या चित्रपटात भूमिका साकारल्या. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, रकुल ‘माशूका’ या म्यूझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे. याशिवाय तिच्याकडे आगामी ‘३१ ऑक्टोबर लेडीज नाईट’ आणि ‘आयलान’ हे साऊथचे चित्रपट आहेत.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

Back to top button