‘आप्पी आमची कलेक्टर’ मधून शिवानी नाईकचा नवा संघर्ष | पुढारी

'आप्पी आमची कलेक्टर' मधून शिवानी नाईकचा नवा संघर्ष

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील ‘आप्पी आमची कलेक्टर’ या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत अपर्णा माने (अप्पी) या मध्यवर्ती भूमिकेतून नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक पदार्पण करणार आहे. शिवानीने याआधी अनेक एकांकिका स्पर्धांमधून भाग घेतला आहे.

ही मालिका एक वेगळा विषय घेऊन येत आहे. अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी आहे जी ग्रामीण भागातील खेडे गावात राहते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही. पण तिचं ध्येय खूप मोठे आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली की, ” मी खूप भाग्यवान आहे की, मला छोट्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळतेय. एक नवीन जबरदस्त प्रेरणा असणारी एक मोठी संकल्पना उराशी बाळगून अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय साध्य करणा-या मुलीची भूमिका मला करायला मिळणार आहे. मी खूप खूश आहे. कारण मी एका ध्येयसमर्पित मुलीची भूमिका करणार आहे. आणि ही अप्पी प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरणार आहे.

‘आप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेची निर्मिती वज्र प्रोडक्शनने केली आहे. याआधी प्रोडक्शनच्या ‘लागीर झालं जी, देवमाणूस, देवमाणूस २’ या मालिका गाजल्या आहेत. त्यामुळे या मालिकेबद्दलही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button