नुसरत जहाँ यांनी कोलकत्यात दिला मुलाला जन्म

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी कोलकता येथील रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. नुसरत जहाँ यांना २५ ऑगस्ट रोजी अभिनेता यश दासगुप्ता यांनी रुग्णालयात दाखल केले होते.

नुसरत जहाँने नुकताच एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत नुसरत यांनी डोळ्यावर चष्म्यासोबत टिशर्ट घातल्याचे दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘डर के ऊपर भरोसा. #positivity #morningvibes’. असं लिहिले आहे. हा फोटो मुलाला जन्म देण्याआगोदर आहे.

यानंतर नुसरत यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सर्वाची प्रकृती ठिक असल्याचे म्हटले जात आहे. ही माहिती सोशल मीडियावर मिळताच मिमी चक्रवर्तीसोबत अनेक बॉलिवूड स्टार्स आणि चाहते शुभेच्छा देत आहेत.

याआधी काही महिन्यांपूर्वी नुसरत जहाँ यांनी बेबी बंपचे फोटो शेअर करून ही गुडन्यूज दिली होती.

यश दासगुप्ताला डेट केल्याचा खुलासा

नुसरत जहाँ यांनी उद्योगपती निखिल जैन यांनी १९ जून २०१९ मध्ये दोघांनी तुर्कीमध्ये लग्न केले होते. परंतु, लग्नानंतर काही वर्षांतच त्यांच्यात मतभेदास सुरूवात झाली. गेल्या एक वर्षापासून नुसरत आणि निखिल दोघेही विभक्त राहतात.

याचदरम्यान निखिलने नुसरतला अभिनेता यश दासगुप्ताला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. यासोबत निखिलने ती प्रेग्नेंट असल्याचे आपल्याला माहिती नसल्याचे देखील म्हटले होते. याच दरम्यान नुसरतने आपल्या लग्नाविषयी अनेक धक्कादायक खुलासे केल्याने चर्चेत आली होती.

हेही वाचलंत का? 

Exit mobile version