अरे बाप रे! मलायका अरोरा दिसतेय 'सापा'च्या वेशभूषेत

 

मुंबई, पुढारी ऑनलाईन : मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती प्रत्येक दिवशी आपले वेगवेगळ्या पोजमधील फोटो शेअर करत असते. मलायकाने सोशल मीडियावर नुकतेच काही लेटेस्ट फोटो शेअर केलेली आहेत. या फोटोमध्ये मलायका स्नॅक प्रिंट गाऊनमध्ये आकर्षक पोज देताना दिसत आहे.

मलायकाने (Malaika Arora) जो ड्रेस परिधान केलेला आहे तो नईम खान आणि दीपा गुरगानी यांनी डिजाईन केलेली आहे. तर, मलायकाचे या ड्रेसवरील हाॅट फोटो विवेक देसाईने क्लिक केलेले आहेत. मलायकाचा हा नवा फोटोशूट पाहून तिचे चाहते मोठ्या प्रमाणात काॅमेंट्स करत आहेत.

केवळ अर्ध्या तासांत तिच्या फोटोंना ७० हजारांपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. काॅमेंट्समध्ये चाहत्यांनी मलायकाच्या फोटोंवर कौतुक केले आहेत. इतकंच नाही तर, मलायकाची दोस्त महीप कपूर आणि सोहेल खानची पत्नी सीमा खान यांनी देखील काॅमेंट केलेली आहे. दोघींना फायरची इमोजी देत तिचे कौतुक केलेले आहे.

मलायकाच्या छोट्या बहिणीने म्हणजेच अमृता अरोराने काॅमेंटमध्ये लिहिलं आहे की, “ओह… अब रुक भी जाओ.” काहींनी मलायकाला गाॅर्जियस, काहींना स्टनिंग, अशाही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. सोशल मीडियावर मलायकाचे हे फोटो वेगात व्हायरल होत आहेत.

या हाॅट अभिनेत्रींचे बोल्ड फोटो पाहिलेत का?

Exit mobile version