'महेश भट्ट परिवारापासून आझादी मिळाली; त्यांचा चित्रपट दोन रूपयालाही कोणी घेणार नाही' | पुढारी

'महेश भट्ट परिवारापासून आझादी मिळाली; त्यांचा चित्रपट दोन रूपयालाही कोणी घेणार नाही'

मुंबई: पुढारी ऑनलाईन

चित्रपट निर्माते महेश भट्ट यांचा ‘सडक २’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच प्रचंड चर्चेत आहे. संजय दत्त, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सडक २’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला १ कोटीपेक्षा अधिक जणांनी डिसलाईक केले आहे. प्रदर्शनाच्या २४ तासांमध्ये यूट्यूबर सर्वाधिक डिसलाइक मिळालेला हा ट्रेलर ठरला आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता केआरकेने ट्विट करत भट्ट कुटुंबावर निशाणा साधला. 

काय म्हटले आहे ट्विटमध्ये केआरकेने ?

संपूर्ण भट्ट परिवाराला स्वातंत्र मिळाल्याबद्दल अभिनंदन. सडक २ चित्रपटाच्या ट्रेलरला १ कोटीपेक्षा अधिक डिस्लाइक्स मिळाले आहेत. आणि हा व्हिडिओ युट्यूब चॅनेलवर सर्वाधिक डिस्लाईक्स मिळणारा पहिला ठरला आहे. आता यापुढे भट्ट कधी कोणता चित्रपट निर्माण करणार नाहीत कारण आता कोणीही त्यांचा चित्रपट २ रूपयालासुद्धा विकत घेणार नाही. अशा परखड शब्दात केआरकेने ट्विट केले आहे. 

तब्बल २१ वर्षांनंतर दिग्दर्शन

या चित्रपटाच्या निमित्ताने महेभ भट्ट यांनी तब्बल २१ वर्षांनंतर दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट येत्या २८ ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वीच त्याचा ट्रेलर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. या चित्रपटात संजय दत्त, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकराणानंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही हा वाद पेटून उठला. त्यामुळे स्टारकिड्सवर जोरदार टीका झाली. यामध्ये सर्वाधिक टीका महेश भट्ट आणि त्यांच्या कुटुंबीयांवर करण्यात आली होती. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांनी महेश भट्ट यांच्या आगामी चित्रपट ‘सडक २’च्या ट्रेलरवर डिसलाइकचा भडिमार केला असल्याचे म्हटले आहे.

Back to top button