अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांना कोरोनाची लागण | पुढारी

अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांना कोरोनाची लागण

मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

अभिनेते दिलीप कुमार यांचे बंधू अहसान खान आणि असलम खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी रात्री त्यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी कोरोना उपचारांना सुरुवात केली आहे. डॉक्टर जलील पारकर आणि डॉ. निखिल गोखले हे त्यांच्यावर उपचार करत आहेत.

दिलीप कुमार यांचे वय 97 वर्षांचे असून, त्‍यांच्या भावांचे वयही जास्त आहे. त्यामुळे डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांना ह्रदयविकार आणि रक्तदाबाचाही त्रास आहे अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली. त्या दोघांनाही अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या शरीरातील  ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे सतत ऑक्सिजनचे प्रमाण तपासले जात असून, ऑक्सिजन देण्यात येत आहे. 

तसेच नॉन इंव्हिजीबल व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचेही डॉ. पारकर  यांनी सांगितले आहे. दरम्यान दिलीप कुमार यांच्या पत्नी सायराबानो यांनी असलम आणि अहसान हे लवकरच बरे होऊन घरी परततील अशी आशा व्यक्त केली आहे.

Back to top button