सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुशांतच्या बहिणीचे पहिलेच ट्विट; म्हणाली... | पुढारी

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुशांतच्या बहिणीचे पहिलेच ट्विट; म्हणाली...

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र सरकारने सीबीआयला तपासात सहकार्य करावे, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाच्या निकालानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंह हिने ट्विट करत देवाचे आभार मानले आहेत. 

कोर्टाच्या निकालानंतर काय म्हणाली बहिण श्वेता

आभारी आहे देवा! तुम्ही आमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले आहे !! पण ती फक्त सुरुवात आहे … सत्याच्या दिशेने पहिले पाऊल! सीबीआयवर पूर्ण विश्वास असल्याचेही श्वेताने ट्विटमध्ये म्हटले आहे. 

तसेच दुसरे ट्विट करत परिवाराचे अभिनंदन केले आहे. यासोबतच खूप आनंदी …विजय आणि निःपक्षपाती तपासाच्या दिशेने पहिले पाऊल असल्याचे तिने म्हटले आहे. 

सुप्रीम कोर्टाच्या या निकालापूर्वी श्वेताने महाभारतामधील एक फोटो ट्विट केला आहे. देव आमच्यासोबत आहे, असे म्हटले होते. सुशांतची बहिण श्वेताने ट्विट केलेल्या फोटोत श्रीकृष्ण रथाचं सारथ्य करताना, तर अर्जुन धनुष्यबाण चालवत असताना दिसत आहे. ‘आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे न्या. शरणागती’, असे  ट्विटमध्ये म्हटले होते.

Back to top button