सीबीआय चौकशीवर अंकिता लोखंडे म्हणाली.. | पुढारी

सीबीआय चौकशीवर अंकिता लोखंडे म्हणाली..

मुंबई : पुढारी ऑनलाईन

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अभिनेता सुशांतसिंह राजपुतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोंखडे हिने प्रतिक्रिया देत न्याय देवतेचा फोटो शेअर केला आहे. तसेच, अंकितासोबत बी टाऊनमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आपले मत व्यक्त केले आहे. 

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र सरकारने सीबीआयला तपासात सहकार्य करावे, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. 

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर अंकिता लोखंडेने ट्विटरवर न्याय देवतेचा फोटो शेअर करत न्यायालयाचा निकाल हा सत्याला धरून आहे. अखेर सत्याचा विजय असे म्हटले आहे. 

तसेच, परखड मत मांडणारी अभिनेत्री कंगणा रनौत आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”माणुसकीचा विजय, प्रत्येक सुशांतच्या योद्ध्याचे अभिनंदन. मी पहिल्यांदाच अशी शक्तिशाली एकता आणि रोष पाहिला आहे. खूप मस्त. सीबीआय आता हे प्रकरण हाताळेल, असे ट्विट कंगणाने केले आहे. 

”सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाने सूचना दिल्या आहेत. आता सत्य बाहेर येईल” अशी आशा अक्षय कुमारने केली आहे. 

Back to top button