टाईम्स म्युझिकने आणला ‘राजा गणपती’ अल्बम  | पुढारी

टाईम्स म्युझिकने आणला 'राजा गणपती' अल्बम 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

लालबागच्या राजाच्या सहकार्याने टाईम्स म्युझिकने आपला ‘राजा गणपती’ हा नवीन अल्बम भाविकांच्यासाठी आणला आहे. यामध्ये भारतातील लोकप्रिय  कलाकार, गायक आणि संगीतकारांद्वारे १० ट्रॅक तयार करण्यात आले असून भाविकांच्यासाठी हा  एक खजिना आहे. ‘सुखकर्ता दुःखहर्ता, शेंदूर लाल चढायो, जय गणेश देवा, दुर्गे दुर्घट भारी, घालीन लोटांगण, पायी हळू हळू चाला, बाप्पा मोरया रे, प्राणम्य शिरसा देवं, वक्रतुंड महाकाय, वातापी  गणपती, अशा  लोकप्रिय आणि पारंपारिक आरत्या, भजन, श्लोक आणि स्तोत्रे ह्या अल्बममध्ये आहेत. तसेच टाईम्स म्युझिकने दाक्षिणात्य भक्तांसाठीसुद्धा भव्य ऑनलाईन सेलिब्रेशनची निर्मिती केली असून त्यात के. विजय प्रकाश, बॉम्बे जयश्री, सुधा रघुनाथन, श्रीनिवास अशा गायकांनी आपली कला सादर केली आहे. 

दिपेश वर्मा यांनी या अल्बममधील गाण्यांना संगीताने सजविले असून अमित पाध्ये यांनी हेमा मालिनी यांनी गायलेल्या स्तोत्रांना संगीत दिले आहे. लालबागच्या राजाला समर्पित राजा गणपती हे गाणे तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केले आहे.

पारंपरिक आणि नव्याची सांगड घालून घरोघरी हा उत्सव दिमाखात साजरा व्हावा ह्यासाठी बॉलिवूडचे गायक आरत्यांसह आपल्या भेटीस आणण्याचे  टाईम्स म्युझिकचे उद्दीष्ट होते. त्याप्रमाणे १० दिवसांचा हा सोहळा लक्षात घेऊन १० गाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे.  

– मंदार ठाकूर, टाईम्स म्युझिक 


टाईम्स म्युझिकसह नामांकित गायकांसह आरती, प्रार्थना आणि स्तोत्रे यांचा अल्बम तयार करण्याचा अनुभव अद्भुत होता. 

– दिपेश वर्मा, संगीतकार आणि संगीत निर्माता  


मी प्रथमच आरती गात आहे. ‘जय गणेश देव आरती’ ही आरती लोकांना आवडेल अशी अशा करतो.

– गायक, अंकित तिवारी


यावर्षी गणपती उत्सव घरच्याघरी साजरा करणार आहोत आणि आम्ही गायलेल्या व दिपेश वर्मा यांनी संगीतबद्ध केलेल्या या आरत्या आणि गाणी आपापल्या घरी सर्वजन गाऊया. 

– विशाल आणि शेखर  


यावर्षी सर्व सण वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातील, बाप्पा माझ्या घरी दरवर्षी येतात, मी माझ्या कुटुंबासमवेत हा उत्सव साजरा करतो. लालबाग राजासाठी गाताना मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. सिद्धार्थ आणि शिवम ह्या माझ्या मुलांसमवेत गाण्याची मजा काही औरच होती. 

– गायक, संगीतकार आणि कलाकार शंकर महादेवन  


सुखकर्ता आणि शेंदूर लाल चढायो, या गाण्यावर काम करणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. यावर्षी गणेश चतुर्थी साजरी करणे खूप वेगळे असेल. परंतू या आरत्या श्रोत्यांना भक्तीतून ऊर्जा  देईल अशी आशा आहे. 

– गायिका, नीती मोहन  


सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती मराठीत म्हटली  जाते. हिंदीभाषिकही मराठीतच ही आरती गातात पण त्याचा अर्थ त्यांना कळत नाही म्हणून प्रथमच ही आरती हिंदीमध्ये येत आहे. ती गाण्याची संधी आम्हाला मिळाली ह्या बद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. 

– मीत ब्रॉस 


तिघींनी मिळून आम्ही नृत्याचे कार्यक्रम केले आहेत. परंतु पहिल्यांदाच आम्ही तिघी एकत्र गात आहोत. प्प्रणम्य शिरसा देवं, हे सुंदर स्तोत्रम मी गायले. ईशा आणि अहाना यांनी वक्रतुंड महाकाय हे सुंदर गायले. आशा आहे की आपणा सर्वांना ती आवडेल आणि गणेश उत्सवाच्या वेळी आणि इतर वेळीही हे स्तोत्र व प्रार्थना तुम्ही ऐकाल.

– ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आणि मुली ईशा आणि अहाना 


आम्ही एकत्र एका अद्भुत सेलिब्रेशन ट्रॅकवर काम केले. असीस आणि दीदार एक प्रतिभावान गायक बहिणी आहेत आणि देव नेगी यांचा आवाज गाण्याचे सार आहे. या वर्षी आपण आणूया बाप्पाला घरी जा आणि त्याचे आशीर्वाद मिळवा. जेव्हा तुम्हाला राजा गणपती आठवेल तेव्हा ते वाजवा.

– संगीतकार, तनिष्क बागची 

Back to top button