देवदर्शनास जाताना तनुश्रीच्या कारला अपघात | पुढारी

देवदर्शनास जाताना तनुश्रीच्या कारला अपघात

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवुड अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या ( Tanushree Dutta ) कारचा ब्रेक फेल होवून अपघात झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. हा अपघात उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात असताना झाला आहे. याहाहतची माहिती तनुश्रीने स्वत: सोशल मीडियावर दिली आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ता ( Tanushree Dutta ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शन घेताना दिसली आहे. यावेळी ती लाल रंगाच्या चुडीदारमध्ये मंदिराच्या आवारात दिसत आहे. यावेळी खास करून तिच्या ड्रेसवर पांढऱ्या रंगाची ओढणी आणि कपाळावर भंडारा दिसत आहे. याच दरम्यान शेअर केलेल्या एका फोटोत तनुश्रीच्या पायाला जखम झाल्याचे दिसत आहे. यावरून देवदर्शनाला जाताना तनुश्रीच्या कारला अपघात झाल्याची माहिती समजते.

तर तनुश्री स्वत: या फोटोच्या कॅप्शनमध्ये या अपघाताची माहिती दिली आहे. यात तिने ‘पहिल्यांदाच माझा अशा रस्त्यावर अपघात घडला आहे. आजचा दिवस खूपच धाडसी होता. या अपघातात माझा पायाला दुखापत झाली असून टाके पडले आहेत. या अवस्थेतही मी देवदर्शन घेतले आहे.’

तनुश्रीने २००३ मध्ये फेमिना मिस इंडिया पेजेंट जिंकून मॉडेलिंगची सुरुवात केली. यानंतर तिने २००५ मधील ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून बॉलिवूड पहिल्यांदा पदार्पण केले आहे. यानंतर ती शेवटची अपार्टमेंट (२०१०) मधील चित्रपटात दिसली.

हेही वाचलंत का? 

Back to top button