Sai Tamhankar : मँगो गर्ल 😍; सईच्या शर्ट- मिनी स्कर्टचा जलवा | पुढारी

Sai Tamhankar : मँगो गर्ल 😍; सईच्या शर्ट- मिनी स्कर्टचा जलवा

पुढारी ऑनलाईन : मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि अभिनेता ललित प्राकरचा आगामी चित्रपट ‘पेटपुराण’ लवकरच चाहत्याच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सईने आदितीची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर अतुलच्या भूमिकेत ललित प्रभाकर आहे. सध्या सई या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच दरम्यान सई पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटोशूटने चर्चेत आली आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरने ( Sai Tamhankar ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील खास म्हणजे, सईच्या हास्याने जादू केली आहे. यावेळी सई फोटोला पोझ देताना आपल्या गालावर हात ठेवल्याचे दिसते. सई या फोटोशूटमध्ये स्लिमसह खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसतेय. तिचा हा लूक पाहून सर्वचजण भारावून गेले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘आगामी चित्रपट ‘पेटपुराण’चे प्रमोशन. ‘ असे लिहिले आहे. यावरून तिच्या पेटपुराण चित्रपटाचे शूटिंग संपले असून त्याचे प्रमोशन सुरू असल्याचे समजते. यावेळी तिने पिवळ्या रंगाचा शर्ट आणि पिवळ्या रंगाचा मिनी स्कर्ट घातल्याने तिला ‘मँगो गर्ल’ असे संबोधले जात आहे.

हा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह मराठी कलाकारांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. यात अभिनेत्री गौरी नलावडे हिने फोटोंवर तीन फायरचे ईमोजी शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे. एका युजर्सने ‘सुंदर लूक!!!! 💛🔥’, ‘मँगो डॉली, मँगो गर्ल 😍😍’, ‘So cute, Euuuu🔥❤️’, ‘Mango 🥭’, ‘Ohhhhhh hoooooo…, So beautiful, Nice pic ❤️’, ‘Superb.., Stunning 🔥🔥🔥🔥’. दुसऱ्या एकाने ‘आय हाय… मंगो आईस्क्रीम..😍❤️❤️’, ‘कल चांद से तेरे हुस्न की तारीफ क्या करी, सारी रात फिर वो कहीं दिखा ही नहीं |🔥🔥’ यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

याआधी सईने सॅटीन व्हाईट सिल्व्हर वन पीस ड्रेसमध्य़े हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने Served !!, काय काय अनी !. आणि Glam bam ! असे लिहिले होते. सईच्या या फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. याशिवाय सईच्या इन्स्टाग्रामवर अनेक हॉट फोटोज आणि व्हिडिओज पाहायला मिळतात.

नुकताच सईचा आगामी ‘पेटपुराण’ चित्रपट प्रदर्शनास सज्ज होत आहे. या चित्रपटात सईने आदितीची आणि ललित प्रभाकरने अतुलच्या भूमिका साकारली आहे. या कपलला मुले व कुटुंब नको आहे. पण, समाजात वावरताना त्यांना यावरूनच बरेच टोमणे आणि टीका सहन करावी लागते. परिपूर्ण कुटुंबाप्रती त्यांचा आगळावेगळा दृष्टीकोन आहे. असे कथानक या चित्रपटाभोवती फिरते. चित्रपटाची निर्मिती व लेखन दिग्दर्शक ज्ञानेश जोटिंग यांनी केले आहे. हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. ही एक सीरीज असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by The Cat Mommy (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by The Cat Mommy (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vinay Raul (@raulvinayofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by The Cat Mommy (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by The Cat Mommy (@saietamhankar)

Back to top button