पुढारी ऑनलाईन : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमी अपडेटस् देत असते. तिने अक्षय्य तृतीयेच्या आणि ईदच्या शुभेच्छा सोशल मीडियावर दिल्या. याच दरम्यान तिने राज ठाकरेंनी दिलेल्या भाषणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. परंतु, लगेच तिने ती पोस्ट एडिट केली आहे.
प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) तिच्या इन्स्टाग्रामवर मराठमोळ्या लूकमधील एक फोटो शेअर केली आहे. यावेळी ती लाल आणि हिरव्या रंगाच्या भरजरी लेहग्यांत दिसते. यासोबत तिने साजेशीर दागिने परिधान केले आहे. हा फोटो शेअर करताना तिने चाहत्यांना अक्षय्य तृतीयेच्या आणि ईदच्या शुभेच्छा भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
यासोबत दुसऱ्या एक तिने वर्तमानपत्रातील एका लेखाचा फोटो शेअर केला आहे. यात तिने मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत असे नमूद केले. परंतु, काही काळातच तिने राज ठाकरेंवर दिलेली प्रतिक्रिया डिलीट करून फक्त शुभेच्छा ठेवल्या आहेत.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. (आज सोनं खरेदीचा दिवस म्हणून अंगावर सर्वाधिक सोनं असलेला फोटो टाकतेय.)' असे म्हटले आहे.
एडिट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये आधी तिने ' आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी मी आशा करते. #शांतताप्रिय #त्रस्तनागरिक धन्यवाद. राज ठाकरे यांचे सगळ्यासाठी केलेले संभाजीनगर सभेतील हिंदूच्या- महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकले. मन अगदी अभिमानानं भरून आला, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशा प्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटत..? खूप धन्यवाद", असे कॅप्शन तिने म्हटले होते. यामुळे तिने ही पोस्ट नेमकी का डिलीट केली?, काय कारण असावे?, एडिंट का केली? असे अनेक तर्क- वितर्क सोशल मीडियावर लावले जात आहेत.
हेही वाचलंत का?