kangana ranaut : कंगनाने नाकारला होता ‘डर्टी पिक्चर’ | पुढारी

kangana ranaut : कंगनाने नाकारला होता ‘डर्टी पिक्चर’

नवी दिल्ली ः बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने दमदार अभिनयाच्या बळावर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने आतापर्यंत अनेक मोठे चित्रपट नाकारण्यासही मागेपुढे पाहिले नव्हते. यासंदर्भात बोलताना कंगनाने सांगितले की, आपल्याला ‘डर्टी पिक्चर’ हा चित्रपट ऑफर झाला. पण मी तो नाकारला होता. (kangana ranaut)

‘डर्टी पिक्चर’ चित्रपटाबद्दल बोलताना कंगनाने सांगितले की, मला नाही वाटत की, मी विद्या बालन इतकी शानदार भूमिका केली असती. तसेच मी राजकुमार हिरानी अथवा संजय लीला भन्साळी यांच्या धर्मा प्रोडक्शन, वायआरएफ अथवा खान्सच्या चित्रपटांसारखे कन्व्हेंशनर चित्रपट केले आहेत. (kangana ranaut)

तरीही मी बॉलीवूडमध्ये टॉप लीडिंग अ‍ॅक्ट्रेस आहे. मी स्वत:च्या बळावर माझे नाव कमावले. भलेही मी अत्यंत गाजलेला ‘डर्टी पिक्चर’मध्ये काम करू शकले नाही. पण मला याचा पश्चात्ताप होत नाही. दरम्यान, कंगनाने बॉलीवूडमधील आपली 16 वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. तिने ‘गँगस्टर’मधून डेब्यू केले होते. (kangana ranaut)

हेही वाचलतं का?

Back to top button