बुलडाणा : वृद्ध मातेवर बलात्कार; नराधम पुत्राला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा | पुढारी

बुलडाणा : वृद्ध मातेवर बलात्कार; नराधम पुत्राला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा : आपल्या 68 वर्षीय जन्मदात्रीवर अमानुषतेने बलात्कार करणा-या नराधम पुत्राला न्यायालयाने आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. एखाद्या पशूलाही लाजवणारी आणि मातापुत्राच्या नात्याला कलंकित करणारी ही घटना पिंपळगाव सराई (ता.बुलडाणा) येथे ५ जून २०२१ रोजी घडली होती.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रात्री अकराचे सुमारास किशोर खंदारे (वय ४५ ) हा मद्यपान करून घरी आला. त्याची पत्नी माहेरी गेली होती. आणि वृद्ध आई घरात एकटीच होती. किशोर याने त्या रात्री झोपेत असलेल्या आपल्या आईवर तीनवेळा बलात्कार केला. ही घृणास्पद व संतापजनक घटना पीडित मातेने सकाळी आपली मुलगी व चुलत सुनेला सांगीतली. नातेवाईकांना सोबत घेऊन रायपूर पोलीस ठाण्यात नराधम पुत्राविरूद्ध बलात्काराची तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती.

विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. एन. मेहेरे यांचे न्यायालयात सुनावणी होऊन आठ साक्षी नोंदण्यात आल्या. आरोपी किशोर खंडारे याने त्याचे वृद्ध आईवर बलात्कार केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला आजीवन सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सहायक सरकारी वकील एस. पी. हिवाळे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

हेही वाचा  

Back to top button