व्यावसायिक गॅस सिलेंडर दरांसहीत विमानाचे इंधन दरही कडाडले | पुढारी

व्यावसायिक गॅस सिलेंडर दरांसहीत विमानाचे इंधन दरही कडाडले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशभरात दिवसेंदिवस महागाईचा भडका उडत आहे. त्यामध्ये तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, त्याचबरोबर गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर व्यावसायिक गॅस सिलेंडर दरांसही आता तेल कंपन्यांनी विमानाच्या इंधन दरात (एटीएफ) 3.22 टक्क्यांनी वाढ केली आहे. चालू वर्षात एटीएफ दरात झालेली ही सलग नववी वाढ आहे.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, एटीएफ दरात प्रती किलोलीटरमागे 3649.13 रुपयांची वाढ झाली आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत हे दर 1 लाख 16 हजार 851 रुपयांवर गेले आहेत. मागील काही दिवसांपासून इंधन दरामध्ये सातत्‍याने वाढ होत आहेत. तर आता मे महिन्याची सुरुवातच गॅस सिलेंडर दरातील वाढीने झालेली असून सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात 102.50 रुपयांनी वाढ केली आहे.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नवीन दरवाढीनंतर 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 2253 रुपयांवरून 2355.50 रुपयांवर गेले आहेत. तर दुसरीकडे 5 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचे दर 655 रुपयांवर गेले आहेत. या आधी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला देखील गॅस सिलेंडर दरात 250 रुपयांची तर मार्चच्या सुरुवातीला 105 रुपयांची वाढ झाली होती. शिवाय 9 मार्च रोजी हे दर 9 रुपयांनी वाढविण्यात आले होते.

एटीएफ दरात सातत्याने वाढ केली जात असल्याने आगामी काळात विमान प्रवास महागण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांनी सलग 25 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे स्थिर ठेवले आहेत. दरवाढीला ब्रेक देण्याच्या आधी सातत्याने पेट्रोल-डिझेल दरात वाढ करण्यात आली होती. इंधनाचे दर त्यावेळी लीटरमागे १० रुपयांनी वाढविण्यात आले होते.

हेही वाचा  

Back to top button