फॉर यूअर आईज ओन्ली | पुढारी

फॉर यूअर आईज ओन्ली

पुढारी ऑनलाईन

रसिकांना आठवत असेल तर याच शीर्षकाचा यापूर्वी एक बाँडपट येऊन गेला आहे. पण आता विषय बाँडपटांचा नाही. पण गुप्तहेरपटाचा नक्कीच आहे. स्कॅम 1993 :द हर्षद मेहता स्टोरीमुळे नावारूपाला आलेला अभिनेता प्रतिक गांधी याच्या आगामी वेबसीरीजचे हे नाव आहे. नेटफ्लिक्स या सीरीजची निर्मिती करत आहे. प्रतिक यात एका गुप्‍तचर अधिकार्‍याच्या भूमिकेत दिसणार आहे. सुमित पुरोहित या सीरीजचे दिग्दर्शन करणार आहे. 70 दशकातील गुप्तचरांच्या कारवायांवर ही सीरीज आधारीत आहे. तीन देशात या सीरीजचे शूटिंग होणार आहे. जूनपासून या सीरीजच्या शूटिंगला सुरवात होऊ शकते.

दरम्यान, प्रतिकची मुख्य भूमिका असलेली आणखी एक सीरीज सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. द ग्रेट इंडियन मर्डर असे या सीरीजचे नाव असून ती 4 फेब्रुवारी रोजी ओटीटीवर येत आहे. विकास स्वरूप यांच्या सिक्स सस्पेक्ट्सया कादंबरीवर ही सीरीज आधारीत आहे. याच रिचा चड्ढा, रघुवीर यादव, आशुतोष राणा, पावोली दाम यांच्याही भूमिका आहेत. 9 भागांच्या या सीरीजचे दिग्दर्शन तिग्मांशु धुलिया यांनी केले आहे.

Back to top button