'संस्कारी बहू' राधिका मदान बोल्ड लूकमुळे ट्रोलिंग | पुढारी

'संस्कारी बहू' राधिका मदान बोल्ड लूकमुळे ट्रोलिंग

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री राधिका मदान हिने मोजक्या भूमिकेतून तिची ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयासह ती बोल्ड ड्रेसिंग सेन्ससाठीही ओळखली जाते. तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तिला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते.

नुकतेच राधिकाने बिकिनीतील एक बोल्ड फोटो सोशल मीडियातून शेअर केला आहे. अर्थातच चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे, तर ट्रोलर्सच्याही ती निशाण्यावर आली आहे. कधीकाळी टी.व्ही.वरील संस्कारी बहू असलेल्या या अभिनेत्रीच्या या लूकने अनेकांचे होश उडवले आहेत. असो, पण राधिकाच्या चित्रपटांचे विषय मात्र ऑॅफबीट असतात.

छोट्या पडद्यावरील भूमिकांतून प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये ‘पटाखा’, ‘मर्द को दर्द नहीं होता’, ‘अंग्रेजी मीडियम’, ‘शिद्दत’ हे चित्रपट आणि नेटफ्लिक्सची वेबसीरिज ‘रे’ मध्ये काम केले आहे. तिची फॅनफॉलोविंग देखील मोठी आहे.

Back to top button