‘ओमायक्रॉन’ इतक्या वेगाने का पसरत आहे ? WHO ने सांगितली ३ मोठी कारणे | पुढारी

'ओमायक्रॉन' इतक्या वेगाने का पसरत आहे ? WHO ने सांगितली ३ मोठी कारणे

पुढारी ऑनलाईन डेस्क

ओमायक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराने भारतासह जगभरात हाहाकार माजवला आहे. देशात दररोज एक लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्णांची भर पडत असून, हे पाहता तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO ने शेअर केलेल्या नवीन आकडेवरून असे दिसून येते की, गेल्या आठवड्यात जगभरात कोरोना संसर्गाची सुमारे 10 दशलक्ष नवीन प्रकरणे आढळून आली आहेत, ज्यात ओमायक्रॉनचे रूग्ण सर्वात जास्त असल्याचे दिसून येतय. याबाबत डब्ल्यूएचओच्या कोविड-19 च्या तांत्रिक गटाचे प्रमुख मारिया वॅन कारकोव्ह यांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून, तो किती प्राणघातक आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी लोक काय करू शकतात हे सांगितले आहे.

याबाबत पुढे बोलताना कारकोव्ह म्हणाले की, जगभरात ओमायक्रॉन रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये हॉस्पिटलायझेशनचे धोके कमी असले तरी, मोठ्या संख्येने लोकांना क्लिनिकल केअरची आवश्यकता आहे.

ओमायक्रॉनमुळे वाढत असलेल्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणात दबाव येत आहे. हा विषाणू इतक्या मोठ्या वेगाने का पसरत आहे याची प्रमुख ३ कारणे उघड केली आहेत.

Golden Globe 2022: विल स्मिथ सर्वोत्कृष्ट अभिनेता,ओ यंग सू यांनाही पुरस्कार

पहिले कारण –

ओमायक्रॉन विषाणू अनेक कारणांमुळे लोकांमध्ये सहज पसरत आहे. त्यापैकी पहिले कारण म्हणजे, या विषाणूमध्ये आढळणारे उत्परिवर्तन ते मानवी पेशींना अधिक सहजपणे चिकटू देतात.

दुसरे कारण –

लोकांची रोगप्रतिकारक शक्ती हे दुसरे मुख्य कारण आहे. याचा अर्थ असा की ज्या लोकांना कोरोना विरूद्ध लसीकरण करण्यात आले आहे किंवा त्यांना यापूर्वी संसर्ग झाला आहे, त्यांना देखील ओमायक्रॉनची लागण होत आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर विकसित झालेली प्रतिकारशक्ती काही काळानंतर कमकुवत होत आहे.

तिसरे कारण –

कारकोव्ह यांनी स्पष्ट केले की, ओमायक्रॉन इतक्या सहजपणे पसरण्याचे आणखी एक कारण म्हणजे डेल्टा आणि कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा हा प्रकार वरच्या श्वसनमार्गामध्ये आपले घर बनवत आहे. उर्वरित रूपे फुफ्फुसावर आणि खालच्या श्वसनमार्गावर हल्ला करतात.

इतर कारणे –

डेल्टा आवृत्तीच्या तुलनेत ओमायक्रॉनला गंभीर रोगाचा धोका कमी आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोक सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्क न घालणे इत्यादी नियमांचे पालन करत नसल्यानेही या विषाणूचा प्रसार होत आहे.

या विषाणूचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे करावे असे आवाहनही कारकोव्ह यांनी केले आहे.

हेही वाचा

Back to top button