चीन मुद्दाम कोरोना पसरवत आहे म्हणणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली ! | पुढारी

चीन मुद्दाम कोरोना पसरवत आहे म्हणणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली !

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा

जैविक हत्यार म्हणून चीन हेतुपुरस्पर कोरोना संसर्गाचा फैलाव करीत आहे. अशात केंद्र सरकारला आदेश काढले पाहिजे, अशी विनंती वजा मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. कोरोना रोगराईमागे कुठलेतरी रहस्य दडले आहे, असा विचार करणाऱ्या प्रत्येकाला याचिका दाखल करण्याची परवानगी दिली जावू शकत नाही,अशा कठोर शब्दात न्यायमूर्ती एस.के.कौल आणि न्यायमूर्ती एम.एम.सुंदरेश यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची कानउघाडणी केली.

केवळ प्रसिद्धीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे, असे स्पष्ट मत खंडपीठाने याचिका फेटाळताना व्यक्त केले. चीन नरसंहार करीत आहे का, आंतरराष्ट्रीय प्रभाव काय आहे ? याचा शोध घेण्याचे काम न्यायालयाचे आहे का? असा संतप्त सवाल देखील याचिका फेटाळतांना खंडपीठाने उपस्थित केला.

हेही वाचा

Back to top button