पुढारी ऑनलाईन
79 वा गोल्डन ग्लोबच्या (Golden Globe 2022) विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. या बहुप्रतीक्षित ॲवॉर्ड्सला अनेकवेळा बहिष्कारांचा सामनादेखील करावा लागला. त्यामुळे अनेक अभिनेत्यांनी आपले नामांकन परत घेतले होते. आता हॉलीवूडमध्ये ॲवॉर्ड्स सीजनची सुरुवात गोल्डन ग्लोब ॲवॉर्ड 2022 (Golden Globe 2022) पासून सुरू झाली. या वर्षी समारंभाचे थेट प्रसारण केलं गेलं नाही. गोल्डन ग्लोब्सच्या वेबसाईट आणि त्याच्या सोशल मीडिया पेजवर विजेत्यांच्या नावांची घोषणा केली गेलीय.
यावेळी गोल्डन ग्लोबमध्ये टॉम क्रूज, स्कारलेट जोहानसन आणि अन्य कलाकारांनी सहभाग घेतला नाही. यावेळी 13 डिसेंबर रोजी नॉमिनेशन विषयी माहिती देण्यात आली होती. या सर्व वादांत गोल्डन ग्लोब्स जिंकणाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर, ड्रामा- द पावर ऑफ द डॉग
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चर – जेन कॅम्पियन, द पावर ऑफ द डॉग
सर्वोत्कृष्ट स्क्रीन प्ले, मोशन पिक्चर- बेलफास्ट
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, मोशन पिक्चर ड्रामा- निकोल किडमॅन, बीइंग द रिकॉर्डोस
सर्वोत्कृष्ट अभिनेता, मोशन पिक्चर ड्रामा- विल स्मिथ, किंग रिचर्ड
सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर, म्यूजिकल या कॉमेडी- वेस्ट साईड स्टोरी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, मोशन पिक्चर, म्युझिकल या कॉमेडी- रशेल जेगलर, वेस्ट साईड स्टोरी सर्वोत्कृष्ट अभिनेता, मोशन पिक्चर, म्युझिकल
या कॉमेडी- अँड्रयू गार्फिल्ड, टिक, टिक.. बूम
सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर, विदेशी भाषा- ड्राईव्ह माय कार (जपान)
सर्वोत्कृष्ट टेलीव्हिजन सीरीज- सक्सेशन
सर्वोत्कृष्ट अभिनेता, टेलीविजन सीरीज, ड्रामा- जेरेमी स्ट्रॉन्ग, सक्सेशन
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, टेलीविजन सीरीज, ड्रामा- मायकेला जे रॉड्रीग्यूज, पोज
सर्वोत्कृष्ट सह-अभिनेता, टीव्ही (लिमिटेड सीरीज या मोशन पिक्चर)- ओ यांग-सू, स्क्विड गेम
हेही वाचलं का?