Rajesh Tope : घरीच क्वारंटाईन असणा-या रुग्णाला होम आयसोलेशन किट देणार : राजेश टोपे - पुढारी

Rajesh Tope : घरीच क्वारंटाईन असणा-या रुग्णाला होम आयसोलेशन किट देणार : राजेश टोपे

जालना : पुढारी ऑनलाईन

राज्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार आहे. यातील १७११ रुग्ण आयसीयुमध्ये आहेत. पॉझिटीव्ह केसेसेच्या तुलनेत आयसीयुमधील रुग्णसंख्या १ टक्का आहे, अशी राज्याचे आरोग्य मंत्री माहिती राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, १३ टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. ८५ टक्के रुग्णांना कसलीही लक्षणे नाहीत. टेस्टींग वाढवण्यावर सरकारचा भर आहे. आयसीयु, ऑक्सिजनचा वापर ३० टक्के रुग्णांसाठी केला जात आहे. जिल्हास्तरावर होम आयसोलेशन किट तयात करणार आहे. घरीच क्वारंटाईन असणा-या रुग्णांना होम आयसोलेशन किट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सर्वच राज्यात क्वारंटाईन कालावधी ७ दिवसांचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही क्वारंटाईन कालावधी सात दिवसांचा असेल, असे स्पष्ट करत आरोग्यमंत्र्यांनी जिथे लसीकरण जास आहे तिथे मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचेही यावेळी सांगितले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे…

होम आयसोलेटेड रुग्णांना दिवसातून तीनवेळा फोन करणार

फेब्रुवारी माहिन्यानंतर कोरोनाची तीसरी लाट ओसरेल

केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक झाली.

आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण नाही.

नागरिकांनी निर्बंधांचे पालन करावे.

महाराष्ट्रात जवळपास ९० टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

१५ ते १८ वयोगटातील लसीकरण वाढवणार

Back to top button