कोरोना तिसरी लाट : देशात ऑगस्ट अखेरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट | पुढारी

कोरोना तिसरी लाट : देशात ऑगस्ट अखेरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोना तिसरी लाट देशात ऑगस्ट महिन्याअखेरपर्यंत येवू शकते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) महारोगराई तसेच संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख समीरन पांडा यांनी असा अंदाज वर्तवला आहे.

कोरोना च्या दुस-या लाटेमुळे कमकुवत झालेली रोगप्रतिकारक क्षमता, नवीन व्हेरियंटचा रोगप्रतिकारक क्षमतेवर होणार प्रभाव तसेच विविध राज्यात हटवण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते,

असे मत पांडा यांनी व्यक्त केले आहे.

पंरतु, कोरोनाची तिसरी लाट दुसर्या लाटेपक्षा जास्त भयंकर राहणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

अधिक वाचा :

कोरोनाच्या विरोधात लढताना लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. अशात तिस-या लाटेकरीता कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती हे कारण भयावह ठरू शकते.

रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना लगेच कोरोनाची लागण होऊ शकते. कोरोनाच्या विरोधात लढा दिल्यानंतर पुन्हा मिळवलेली रोगप्रतिकारक शक्ती नव्या व्हेरियंटमुळे कमी होऊ शकते.

असे झाल्यास संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंट मानवी जीवनावर अधिक प्रभाव टाकू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा :

घाईघाईने कोरोना विरोधातील निर्बंध शिथिल केल्यामुळे देखील कोरोनाची तिसरी लाट येवू शकते.

निर्बंध शिथिल केल्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होवू शकते.देशात कोरोनाचे डेल्टा तसेच डेल्टा प्लस पसरले आहेत, असे पांडा म्हणाले.

कोरोनाची तिसरी लाट नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे येऊ शकते, असे भाकित एम्स चे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी नुकतेच वर्तवले होते.

कोरोनाचे नवे व्हेरियंट समोर येत आहेत. पंरतु, सरकारकडून लॉकडाउन आणि अन्य निर्बंधात सूट दिली जात आहे.

अशातच कोरोना प्रादुर्भाव होऊ शकतो, असे मत गुलेरियांनी व्यक्त केले होते.

अधिक वाचा :

दरम्यान, देशात कोरोना महारोगराईची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे.

पंरतु, कोरोना ची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने देशवासियांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. अशात कोरोना लसीकरण विषयीची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.

सर्वच वयोगटातील केवळ ७ कोटी ८० लाख १० हजार ९८९ नागरिकांचेच लसीकरण आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. तर, ३१ कोटी ३५ लाख २९ हजार ५०२ नागरिकांना कोरोना विरोधातील लशीचा किमान पहिला डोस लावण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात लसीकरण अभियानाअंतर्गत दररोज सरासरी २९ लाख ७९ हजार ६०६ डोस लावण्यात आले, हे विशेष.

अधिक वाचा :

Back to top button