डब्ल्यूएचओ : ४० लाख लोकांचा जीव घेणारा कोरोना धारण करणार रुद्रावतार! | पुढारी

डब्ल्यूएचओ : ४० लाख लोकांचा जीव घेणारा कोरोना धारण करणार रुद्रावतार!

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटना म्हणते, “कोरोना महामारीचं आतापर्यंत रूप हे फक्त ट्रेलर होता, यापेक्षा आणखी भयानक चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या काळात कोरोनाचे आणखी नवनवे व्हेरिएंट पसरण्याची शक्यता आहे.”

‘डब्ल्यूएचओ’मधील आपतकालीन समितीनं ही माहिती दिली आहे. समिती पुढे म्हणते की, “महामारी अजूनही संपलेली नाही. जागतिक स्तरावर आणखी भयंकर व्हेरिएंट पसरू शकतात. त्याच्यावर नियंत्रणही मिळवणं अवघड होऊ शकतं”
दोन वर्षांपूर्वी चीनमध्ये आलेला कोरोनाच्या विषाणुने आतापर्यंत जगात ४० लाख लोकांची बळी घेतला आहे. १८ कोटी ९३ लाख जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. अशाच कोरोना प्रत्येक वेळी आपलं रुप बदलताना दिसत आहे.
भारतात डेल्टा व्हेरिएंटनं धुमाकूळ घातलेला आहे. हाच व्हेरिएंट कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेला आहे. त्याच्या पुढचा डेल्टा प्लस नावाचा आणखी एक व्हेरिएंट आलेला आहे आणि तो ६० वेगाने पसरतो.
डब्ल्यूएचओ प्रमुखांनी चीनला म्हंटलं आहे की, “महामारीच्या प्रसाराबाबत माहिती मिळविण्यासाठी सहकार्य करा आणि डेटा उपलब्ध करून द्या.” डब्ल्यूएचओ प्रमुख ट्रेडोस अदनोम पत्रकारांना माहिती देताना म्हणाले की, “कोरोना नेमका कुठून आला, हे शोधण्यासाठी आरोग्य संघटनेनं फ्रेमवर्क तयार केलं आहे. ते सहकार्य चीनकडून मिळेल अशी आशा आहे.”

वाचा आणि पहा : प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीचे फोटो पाहिलेत का?

प्राजक्ता माळीचे हे सुंदर फोटो तुम्ही पाहिलेत का?

हे ही वाचलंत का?

Back to top button