
श्रीनगर, पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीर येथील श्रीनगरमधील दानमर भागातील अलमदार काॅलनीमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कर-ए-तोयबा या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिस हे ज्वाइंट ऑपरेशन राबवत आहे. त्या अतंर्गत परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. आज पहाटे भारतीय जवान आणि लष्कर-ए-तोयबा दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे.
अलमदार भागात अजूनही काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांपासून सलगपणे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमकी सुरू आहेत.
दक्षिण काश्मीर पुलवामामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामध्ये 'लष्कर-ए-तोयबा'चा कमांडर अबू हुरैर याचाही समावेश होता. संबंधित घटनास्थळावरून शस्त्रास्रं आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
हे वाचलंत का?