दानिश सिद्‍दीकी : वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्‍दीकी यांची हत्‍या | पुढारी

दानिश सिद्‍दीकी : वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्‍दीकी यांची हत्‍या

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन : दानिश सिद्‍दीकी यांची अफगाणिस्‍तानमध्‍ये गोळी झाडून हत्‍या करण्‍यात आली. पुलित्‍झर पुरस्‍कार विजेते असलेल्या भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिददीकी यांची हत्या झाल्याची माहिती अफगाणिस्‍तानमधील राजदूत फरीद यांनी दिली.

अधिक वाचा 

दानिश हे अफगाणिस्‍तानमध्‍ये सुरक्षा दलाबरोबर गेले होते. याचचेळी त्‍यांची दहशतवाद्‍यांनी गोळ्या झाडून ह्‍त्‍या केल्‍याचे सूत्रांनी सांगितले. दोन आठवड्यांपूर्वीच माझी त्‍याच्‍याशी भेट झाली होती. मी माझा मित्र गमावला, असे फरीद यांनी
ट्‍विटरवर नमूद केले आहे.

अधिक वाचा 

स्‍थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्‍या माहितीनुसार, दानिश हे कंधारमधील स्‍पिन बोल्‍डक जिल्‍ह्यात गेले होते. यापूर्वी त्‍यांनी अफगाणिस्‍तान विशेष दलाच्‍या कारवाईचे वृत्त दिले होते. तेव्‍हापासून ते दहशतवाद्‍यांच्‍या टार्गेटवर होते.

२०१८ मध्‍ये पुलिज्‍झर पुरस्‍काराने गौरव

यापूर्वी लढाईचे छायाचित्रे घेण्‍यासाठी युद्‍धभूमीवर गेलेल्‍या दानिश यांच्‍या खाद्‍याला दुखापत झाली होती. २०१८ मध्‍ये त्‍यांना पुलिज्‍झर पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले होते. रोहिंग्‍याविषयी त्‍यांनी केलेल्‍या वार्तांकनासाठी हा गौरव करण्‍यात आला होता. त्‍यांनी आपल्‍या करीअरची सुरुवात वृत्तवाहिनी बातमीदार म्‍हणून केली हाेती. यानंतर ते वृत्तछायाचित्रकार झाले होते.

कंधार परिसरात संघर्ष वाढला

मीडिया रिपोर्टनुसार, कंधार शहर परिसरात तालिबानी दहशतवादी आणि अफगाणिस्‍तान सुरक्षा दलामधील संघर्ष तीव्र झाला आहे. तालिबानकडून शहरावर कब्‍जा करण्‍याचा प्रयत्‍न सुरु आहे. स्‍पिन बोल्‍डक जिल्‍ह्यात पाकिस्‍तानच्‍या बलुचिस्‍तान प्रांतातील सीमेवरील दहशतवाद आणि सुरक्षा दलांच्‍या जवानांमध्‍ये चकमक सुरुच आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ :कोण होणार मराठी करोडपती निमित्त अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी खास बातचीत

 

Back to top button