ज्येष्ठ संगीतकार, गायक के. जी. जयन यांचे निधन | पुढारी

ज्येष्ठ संगीतकार, गायक के. जी. जयन यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकतील ज्येष्ठ संगीतकार आणि गायक के.जी. जयन यांचे आज (दि.१६) दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील त्रिपुनिथुरा येथील त्यांच्या घरी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने दक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मल्याळम चित्रपट अभिनेते मनोज के जयन यांचे ते वडील आहेत. जयन यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि.१७) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जयाविजया’ नावाने बनवली ओळख

मल्याळम संगीत क्षेत्रात जयन यांच्या रचना, त्यांची भक्तिगीते, दीर्घकाळ चार्टबस्टर म्हणून साजरे केले गेले आहेत. त्यांचा जुळा भाऊ के. जी. विजयन यांच्यासोबत जयन यांनी अनेक गाण्यांची निर्मिती केली. जी मल्याळी लोकांमध्ये अजूनही प्रसिद्ध आहेत. या दोघांची जोडी “जया-विजया” जोडी म्हणून ओळखली जात होती. त्यांच्या संगीताचा प्रभाव संपूर्ण केरळ राज्यात पहायला मिळतो. आपल्या संगीतमय प्रभावाने त्यांनी लोकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

हेही वाचा :

Back to top button