Manipur Earthquake : मणिपूरच्या उखरुलमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्‍के | पुढारी

Manipur Earthquake : मणिपूरच्या उखरुलमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्‍के

मणिपूर: पुढारी ऑनलाईन : मणिपूरच्या Manipur Earthquake उखरुलमध्ये भूकंपाचे धक्‍के बसले. याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 मोजली गेली; सध्या कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

मणिपूरमध्ये Manipur Earthquake आज (शुक्रवार) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सकाळी ६.५६ वाजता मणिपूरच्या उखरुलमध्ये भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून 90 किलोमीटर खोल होते. यावेळी घाबरलेले लोक घराबाहेर पडले. सध्या तरी कुठलेही नुकसान झाल्याची माहिती अद्‍याप समोर आलेली नाही.

हेही वाचा 

Back to top button