CAA Rules : ‘सीएए’विरोधावरून निर्वासितांची काँग्रेस मुख्यालयाजवळ निदर्शने, बॅरिकेड्स तोडले | पुढारी

CAA Rules : 'सीएए'विरोधावरून निर्वासितांची काँग्रेस मुख्यालयाजवळ निदर्शने, बॅरिकेड्स तोडले

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्र सरकारने ११ मार्चरोजी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू करण्याबाबत अधिसूचना जारी केली होती. पण या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोधकांकडून जोरदार विरोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील निर्वासितांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी काँग्रेस नेते आणि इंडिया आघाडीच्या CAA च्या अंमलबजावणीवरील विधानांच्या विरोधात दिल्लीत निदर्शने केली. त्यांनी आज (दि.१५) दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस समिती कार्यालयाजवळ अशोक रस्त्यावरील आंदोलनादरम्यान बॅरिकेड्स तोडले.  CAA Rules

यावेळी त्यांना सुरक्षा रक्षकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. एक निर्वासित म्हणून असलेल्या नानकी यांनी म्हटले आहे की, “आम्ही अरविंद केजरीवाल, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात आंदोलन करत आहोत. ते आमचे अधिकार का हिरावून घेत आहेत? पंतप्रधान मोदी आम्हाला अधिकार देत आहेत, ते हिरावून घेण्याचा अधिकार कोणाला नाही.”

 

हेही वाचा 

Back to top button