National Consumers Day: “जागो ग्राहक जागो…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील ग्राहकांना आवाहन | पुढारी

National Consumers Day: "जागो ग्राहक जागो..." मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील ग्राहकांना आवाहन

पुढारी ऑनलाईन डेस्क: आज २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आपण नुसतेच ग्राहक न होता सुजाण आणि जागरूक ग्राहक बनूया, असे आवाहने राज्यातील जनतेला केले आहे. या संदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून शेअर केली आहे. (National Consumers Day)

National Consumers Day: ‘या’ गोष्टी तपासून पाहणे अत्यंत गरजेचे

मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आजचा दिवस आपण ‘ राष्ट्रीय ग्राहक दिन ‘ म्हणून संपूर्ण देशभर साजरा करीत असतो. या दिनाचे औचित्य साधून काही महत्वाच्या बाबी अधोरेखित होणे गरजेचे आहे. ग्राहक म्हणून आपण सदोदित जागरूक आणि सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणत्याही वस्तू खरेदी करताना आपण खरेदी केलेल्या वस्तूंच्या किंमती ( M.R.P. ), त्या वस्तूंची मुदत संपण्याची तारीख (expiry date), वजन इत्यादी गोष्टी तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे. (National Consumers Day)

खरेदी केलेल्या वस्तूंची पावती घेण्याची सवय लावा

खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये काही दोष असल्यास आपल्या मुला-बाळांना त्याची बाधा होऊ शकते, म्हणूनच खरेदी केलेल्या वस्तूंची पावती ( RECIEPT ) घेण्याची सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे. ‘ ग्राहक राजा ‘ आहे असे नुसते बोलून चालणार नाही, तर तेवढीच जागरूकता आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये दाखवली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने ग्राहक हा राजा होईल. यासाठी आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आपण सगळे सुजाण आणि जागरूक ग्राहक बनण्याचा निर्धार करूया, असे देखील त्यांनी म्हटले आहे. (National Consumers Day)

हेही वाचा:

Back to top button