जम्मू – काश्मीरच्या दोडामध्ये २५० फूट खोल दरीत बस कोसळली, मृतांचा आकडा ३६ वर (Video) | पुढारी

जम्मू - काश्मीरच्या दोडामध्ये २५० फूट खोल दरीत बस कोसळली, मृतांचा आकडा ३६ वर (Video)

श्रीनगर : पुढारी ऑनलाईन डेस्क – जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील असर विभागात बस दरीत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. २५० फूट खोल दरीत ही बस कोसळली आहे. या अपघातात ३६ जणांचे मृतदेह दरीतून काढण्यात आले आहेत. तर ६ जण गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. जखमींना जिल्ह्यातील किश्तवाड आणि जीएमसी दोडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलीय.

मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून (PMNRF) प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. या अपघाताच्या घटनेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. ”जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे झालेला बस अपघात दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपले जवळचे आणि प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.” असे पीएम मोदी यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.

Back to top button