WEBSITES : चुकूनही क्लिक करू नका 'या' ५ रहस्यमय वेबसाईट, अन्यथा... | पुढारी

WEBSITES : चुकूनही क्लिक करू नका 'या' ५ रहस्यमय वेबसाईट, अन्यथा...

इंटरनेटच्या जगात अशा अनेक वेबसाइट्स (WEBSITES) आहेत, ज्या तयार केल्या गेल्या आहेत आणि अनेक दशकांपासून ऑनलाइन आहेत. परंतु त्या इंटरनेटवर का आहेत? हे कोणालाही माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वेबसाइट्सबद्दल (WEBSITES) सांगणार आहोत. या वेबसाईट्स आपल्याला जोरदार धडकी भरवणाऱ्या आहेत. यापूर्वी तुम्ही या वेबसाईट्सबद्दल क्वचितच ऐकले असेल.

1. Tanasinn :

जर टेनज़ीन नावाची ही वेबसाईट (WEBSITE) उघडली तर तुम्हाला एक विचित्र आवाज ऐकू येईल. हा गूढ आवाज काय आहे हे कोणालाच कळत नाही. तुम्ही वेबसाईटवरील कोणत्याही लिंकवर क्लिक केल्यास, तुम्हाला अनेक कोड दिसतील जे आपोआप स्क्रोल होतील. तसेच, वेबसाइटवर संगीत ऐकण्यासाठी एक विचित्र पॉप-अप आपोआप येत राहते. त्या पॉपवर क्लिक केल्यास एक भयानक संगीत मालिका तुमच्यासमोर सुरु होईल जी अतिशय भीतीदायक वाटते.

2. Sentimental Corp :

ही वेबसाइट उघडल्यानंतर तुम्हाला एक जोडपे टीव्ही पाहताना दिसेल. त्या टीव्ही स्क्रीनवर ज्यावर इंग्रजीत ‘नथिंग ‘(Nothing) लिहिलेले दिसते. स्क्रीन स्क्रोल करून साइटवर गेल्यावर अनेक फोटो दिसतील. जर तुम्ही या चित्रांवर क्लिक केले तर काही विचित्र आणि धडकी भरवणाऱ्या व्हिडिओच्या लिंक तुमच्या समोर येतील. त्या लिंकवर क्लीक करण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्यातील व्हिडिओ पाहून तुम्हाला भीती वाटू शकते.

3. Super Bad :

सुपरबॅड नावाची वेबसाईट दिसायलाच खूप विचित्र आहे. या वेबसाईट्सचे होमेपेज पाहिल्यावर आपल्याला त्या वेबसाईटवर नक्की आहे हे मात्र कळत नाही. वेबसाईटवर गेल्यानंतर स्क्रीनवर एक पिनसारखी आकृती दिसेल, त्यासोबत काही ओळी देखील दिसतील. या पिनवर क्लिक करताच स्क्रीनवर एक विचित्र गोष्ट दिसेल.

तुम्ही यापैकी कोणत्याही गोष्टीवरवर क्लिक केल्यास, एक नवीन डायग्रॅम तुम्हाला दिसेल जी चार भागांमध्ये विभागलेली आहे. त्याचा अर्थ समजणे कठीण आहे. अशी वेबसाईट तुम्ही याआधी क्वचितच पाहिली असेल. तुम्ही क्लिक करताच तुमच्यासमोर विचित्र आकार दिसू लागतील. सर्वात विचित्र गोष्ट अशी आहे की जेव्हा केव्हा आपण होमपेजवर परत जाऊ, तेव्हा प्रत्येकवेळी एक नवीन आकार आपल्याला दिसेल. हे सर्व पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. वेबसाइट नावाप्रमाणेच वाईट आहे.

4. Nobodyhere :

‘Nobodyhere’ नावाच्या या वेबसाईटच्या होमपेजवर प्रवेश केल्यावर, तुम्हाला एका माणसाचे ॲनिमेशन दिसेल ज्यामध्ये तो संगणकावर काहीतरी टाइप करत आहे. वेबसाईटच्या एकदम वरच्या बाजूला भाषेचे चिन्ह दिले आहेत. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे होम पेजवर फेसबुकचे एक चिन्ह देखील आहे, ज्यावर तुम्ही कर्सर घेऊन गेलात तर ॲनिमेशनमध्ये दिसणारी व्यक्ती असे काही करते की तुम्हाला पाहून धक्का बसेल.

त्याच वेळी, वेबसाईटच्या खालील बाजूस काही शब्दांची सूची दिसेल. यापैकी कोणत्याही शब्दावर कर्सर ठेवताच दुसऱ्या बाजूला तुम्हाला त्याच्याशी संबंधित वाक्य दिसेल. जेव्हा तुम्ही एखाद्या शब्दावर क्लिक करता तेव्हा एक नवीन पेज उघडते ज्यामध्ये तुम्हाला त्याच्याशी संबंधित कोड दिसेल. त्यांचा अर्थ काय हे समजणे फार कठीण आहे.

5. Zombo :

झोम्बो नावाची ही वेबसाईट अतिशय विचित्र आहे. या वेबसाईटवर एक विचित्र अतिशय गोष्ट म्हणजे होमपेजवर जाताच तुम्हाला एक गूढ आवाज ऐकू येईल. जो पुन्हा पुन्हा येत राहतो. तसेच या वेबसाइटवर लोडिंग चिन्ह दिसेल. तुम्ही हे पेज कितीही वेळ उघडे ठेवले तरी ते लोड होत नाही.

आता प्रश्न पडतो की ही विचित्र वेबसाइट का आणि कोणासाठी तयार केली गेली आहे. याचे उत्तर सध्या तरी कोणाकडे नाही.

हे ही वाचा :

Back to top button