नोकरी शोधताय या पाच वेबसाईट नक्की पाहा | पुढारी

नोकरी शोधताय या पाच वेबसाईट नक्की पाहा

पुढारी ऑनलाईन डेस्क :  कोरोनामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुळ नोकरी वेबसाईट वर माहिती घेणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत.

मुंबई, पुणे, बंगळूर या शहरात नोकऱ्या आहेत, पण याची माहिती आपल्यापर्यंत लवकर मिळत नाही.

आता आम्ही तुम्हाला काही उपयोगी वेबसाईट बद्दल सांगणार आहोत, याच्या मदतीने तुम्हाला नोकरी मिळण्यास मदत होईल.

अधिक वाचा 

LinkedIn

LinkedIn ही जगातील क्रमांक एकची प्रोफेशनल नेटवर्किंग आणि करियर डेव्हलपेमेंटची वेबसाईट आहे. याचे अ‍ॅपही आहे. LinkedIn वर तुम्ही अन्य यूजर्सशी बोलू शकता.

तुमचा रिझ्यूम अपलोड करणे, तुमच्याबद्दल माहिती देणे व नोकरी शोधू शकता. ही एक मोफत साईट आहे. मात्र तुम्हाला प्रीमियम व्हर्जनसाठी पैसे भरावे लागतील. चांगल्या नोकऱ्यांसाठी हा उपयोगी प्लॅटफॉर्म आहे.

तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर तुम्ही LinkedIn वर असायलाच पाहिजे. तुम्हाला यावर रिझ्युम शेअर करता येतो. निर्णय घेणारे आणि भरती करणारे LinkedIn वर असल्याने, या व्यासपीठावरुन त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे होते.

LinkedIn ला लाईव्ह रिज्युम म्हटलं जातं. LinkedIn प्रोफाईल चांगल्या प्रकारे करून देणाऱ्या कंपन्याही आहेत. त्यांची मदत घेऊनही प्रोफाईल चांगला करू शकता. LinkedIn वर आपण कुणाचा प्रोफाईल चेक केला तर त्यांना मेसेज जातो.

फेसबुक, इन्स्टासारखा स्टॉकिंगचा उपदव्याप इथं करू नका. लिंक्डइन हे Tinder नाही हे नेहमी लक्षात ठेवा. त्या अकाऊंटवर 500च्या वर कनेक्शन असणं चांगलं समजलं जातं.

नैाकरी (Naukri)

भारतातील सर्वात जुनी आणि लोकप्रिय जॉब पोर्टलांपैकी एक म्हणजे नौकरी पोर्टल. हे पोर्टल १९९७ मध्ये सुरु झाले आहे. यावर रोज हजारो नोकऱ्यांची माहिती मिळते. नोकरी शोधणाऱ्यांसाठी हे पोर्टल विनामूल्य आहे.

नौकरी फास्टफॉरवर्ड सेवांसाठी पैसे भरावे लागतात. यामध्ये रिझ्युम राइटिंगचा समावेश आहे. यात रेझ्युम उत्तम पध्दतीने लिहिण्यासाठी तज्ञांची मदत घेऊ शकता. उत्तम पध्दतीने रिझ्युम तयार केला असेल तर नोकरीची संधी मिळू शकते.

upGrad

upGrad हा प्लॅटफॉर्म लोकांना स्वतःला अधिक चांगले बनवणे अथवा नवीन काहीतरी शिकण्यास मदत करतो. येथे लोकांना रोजगाराची संधी मिळते. एवढेच नाही तर हा एक ऑनलाईन हायर एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे, जो इंडस्ट्री-सेंट्रिक प्रोग्राम उपलब्ध करतो. हे प्रोग्राम इंडस्ट्री पार्टनर्सद्वारे तयार केलेले असतात.

Glassdoor

Glassdoor हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जेथे सध्या व आधी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसबद्दल रिव्ह्यू देता येतो.

फिसमधील सोयी-सुविधा, पगार, अनुभव याबाबत रिव्ह्यू शेअर करता येतो. यामुळे लोकांना चांगली कंपनी शोधण्यात मदत होते.

येथे अनामिक पद्धतीने रिव्हू देखील लिहिता येतो. नोकरी शोधताना कंपनीच्या पगाराबाबत देखील येथे बहुतांश वेळा माहिती मिळते.

पोर्टल आपल्याला कार्य संस्कृती, कर्मचार्‍यांच्या तक्रारींचे व्यवस्थापन, व्यवस्थापनाबद्दल कर्मचार्‍यांचे रेटिंग देणे इत्यादी किती जबाबदार आहे हे पाहून देते या प्रमुख वैशिष्ट्याशिवाय ग्लासडोर हे एक लोकप्रिय जॉब पोर्टल आहे आणि ते विनामूल्य आहे.

Indeed

नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची वेबसाईट आहे. या ठिकाणावरून तुम्ही जगभरात कोठेही सहज नोकरी शोधू शकता. यावर नोकऱ्या बहुतांश लोक मोबाइलद्वारेच सर्च करतात.

या वेबसाईटवर नोकरी शोधणे, रिझ्यूम पोस्ट इत्यादी गोष्टी करता येतात.

प्रीमियम व्हर्जनसाठी मात्र पैसे भरावे लागतील. मात्र, याचे मोफत व्हर्जन नोकरी शोधण्यासाठी पुरेसे आहे. यावरून थेट नोकरीसाठी अर्ज करता येतो.

हे ही वाचलं का? 

पाहा व्हिडिओ : आम्ही शब्दवारीचे वारकरी; संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे भाग-16 

Back to top button