Eternals Movie : न्यूड लव्ह सीन देताना ढसाढसा रडली होती सलमा हाएक | पुढारी

Eternals Movie : न्यूड लव्ह सीन देताना ढसाढसा रडली होती सलमा हाएक

पुढारी ऑनलाईन :

मार्वल्स ‘इटर्नल्स’ हा चित्रपट ५ नोव्हेंबरला भारतात रिलीज झालाय. या चित्रपटमध्ये एंजेलिना जोली, सलमा हाएक आणि रिचर्ड मेडन यासारखे कलाकार आहेत. ‘इटर्नल्स’ चित्रपटात हॉलिवूड अदाकारा सलमा हाएक हिने सुंदर काम केलं आहे. या चित्रपटात तिची अजक (Ajak) ही व्यक्तीरेखा आहे. एका मुलाखतीत ती या भूमिकेविषयी सांगितले. ज्यावेळी पहिल्यांदा तिने ‘इटर्नल्स’चा पोषाख घातला आणि स्वत:ला पाहिले, त्यावेळी ती खूप रडली. हे सांगताना मुलाखतीतही तिचे अश्रू थांबत नव्हते. तुम्हाला माहिती आहे का, अमेरिकन चित्रपटात पहिल्यांदाच काम करताना सलमाला न्य़ूड सीन द्यावे लागले होते. त्यावेळीही ती ढसाढसा रडली होती.

salma hayek
salma hayek

सलमाने या चित्रपटात दिले होते निर्वस्त्र सीन

सलमाचं म्हणणं होतं की, १९९२ मध्ये ‘डेस्पेराडो’ हा चित्रपट रिलीज झाल होता. अभिनेता एंटोनियो बँडरेससोबत तिने निर्वस्त्र सीनचे शूटिंग केले. त्यावेळी ती खूप रडली होती.

salma hayek
salma hayek

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ४६ वर्षीय सलमाने फ्रान्सचे करोडपती फ्रांसिस्को हेनरी पिनॉल्टशी विवाह केला आहे. चित्रपटाच्या शूटिंगवेळी तिला या गोष्टीची चिंता होती की, हा चित्रपट पाहिल्यानंतर तिच्या पालकांना काय वाटेल?

salma hayek
salma hayek

काय म्हणाली होती सलमा?

ती म्हणाली होती की, अमेरिकेच्या चित्रपटात ती पहिल्यांदा काम करत होता. मला माहित होतं की, मला हे सीन करावे लागतील. डेस्पेराडोमध्ये माझ्यासाठी एंटोनियासोबत लव्ह सीन करणं खूप कठीण होतं, तेही निर्वस्त्र होऊन.

salma hayek

‘इटर्नल्स’ मार्वल स्टुडिओचा चित्रपट

चित्रपटाची कहाणी केवळ इतकीच आहे की, १० सुपरहीरो पुन्हा एकदा पृथ्वीवरील संभावित विनाश होण्यापासून वाचवण्यासाठी एकत्र येत आहेत. हे सुपरहिरो अमर आहेत आणि सात हजार वर्षांपूर्वीपासून पृथ्वीवर राहत आहेत.

salma hayek

सलमाशिवाय चित्रपटात जेमा चैन , कुमॅल ननजियानी, डॉन ली, हरीश पटेल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. समीक्षकांच्या माहितीनुसार, असं म्हटलं जात होतं की. ही आतापर्यंतचा सर्वात खराब रेटिंग असणारा मार्वल चित्रपट म्हटलं जाऊ शकतं.

salma hayek

ऑस्कर विनर दिग्दर्शक क्लो झाओने यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तर केविन फाइगी आणि नेट मूर यांची निर्मिती आहे.

salma hayek

पाच भारतीय भाषांमध्ये रिलीज झालेला मार्वल स्टुडिओजच्या ‘इटर्नल्स’ची कहाणी ‘अव्हेंजर्स:एंडगेम’ जिथे संपला होती, तेथून सुरू होते. हा चित्रपट अनेक कारणांनी खास आहे. ही चित्रपट मार्वलच्या आतापर्यंतच्या रिलीज झालेल्या अन्य चित्रपटांपेक्षा मोठा आहे. ‘अव्हेंजर्स: एंडगेम’ ३ तासांचा होता. ‘इटर्नल्स’ देखील अडी तासांपेक्षा मोठा आहे. पहिल्यांदाच भारतीय अभिनेता हरीश पटेलदेखील मार्वल्समध्ये दिसतो.

salma hayek

कोण आहे सलमा?

सलमा ५५ वर्षांची आहे. पण, तिचं सौंदर्य पाहून कुणालाही विश्वास होणार नाही की, ती इतकी फिट आहे. तिचे १९.१m followers आहेत. तिने वयाच्या २३ व्या वर्षांपासून टीव्ही मालिकेत काम करायला सुरूवात केली. ‘टेरेसा’ मालिकेत ती ती मुख्य भूमिकेत होती. या मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सलमाचा दमदार अभिनय आणि सौंदर्य पाहून हॉलिवूडनेही तिला ऑफर दिली.

ट्रॅफिक, फ्रीडा, मिडाक वॅली, डोग्मा यासारखे दमदार चित्रपट तिने दिले आहेत. तिचा जन्म २ सप्टेंबर, १९६६ ला मेक्सिकोत झाला. हॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते.

हार्वे विन्स्टीनवर केला होता लैंगिक शोषणाचा आरोप

सलमाने #MeToo मोहिमेंतर्गत हॉलिवूड निर्माता हार्वे विन्स्टीनवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salma Hayek Pinault (@salmahayek)

 

View this post on Instagram

 

A post shared by Salma Hayek Pinault (@salmahayek)

Back to top button