‘हमून’ चक्रीवादळ धोक्याच्या कक्षेत ; ही राज्ये होणार प्रभावित | पुढारी

'हमून' चक्रीवादळ धोक्याच्या कक्षेत ; ही राज्ये होणार प्रभावित

पुढारी वृत्तसेवा : हमून या चक्रीवादळाने धोक्याच्या कक्षेत प्रवेश केला असून, बंगालपासून तामिळनाडूपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा आएमडीने दिला आहे. तसेच याचा फटका इतर राज्यांना सुध्दा बसु शकतो. दिल्ली-यूपीसह इतर राज्यांची स्थिती आपण जाणून घेऊ.
देशातील अनेक राज्यांच्या हवामानात बदल होताना दिसत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी हलकी थंडी कायम राहते. मात्र, हवामान खात्याने चक्रीवादळाच्या संदर्भात अलर्ट जारी केला आहे. याशिवाय राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज आणि उद्या धुके कायम राहील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

‘हमून’विषयी हे माहीत आहे का?

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाला इराणने हमून हे नाव दिले असून, ‘हमून’ हा शब्द पर्शियन शब्द आहे. जो अंतर्देशीय वाळवंट तलाव किंवा दलदलीच्या प्रदेशांना सूचित करतो. हेल्मलँड खोऱ्याला लागून असलेल्या भागात ते नैसर्गिक हंगामी जलाशय म्हणून तयार होतात.

चक्रीवादळ इशारा

बंगालच्या उपसागरात तयार झालेले हमून चक्रीवादळ आज बांगलादेशच्या किनारपट्टीला ओलांडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. याशिवाय IMD ने मच्छिमारांना हमून वादळाचा इशारा दिला आहे. IMD ने तामिळनाडू आणि ओडिशातील मच्छिमारांना समुद्रकिनाऱ्यांवर जाऊ नये असा सल्ला दिला आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये हवामान कसे असेल?

दिल्ली-एनसीआरमध्ये पुढील काही दिवस धुके कायम राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. तथापि, राष्ट्रीय राजधानीतील हवामान दिवस जसजसा पुढे जाईल तसतसे स्वच्छ राहील. येत्या काही दिवसांत दिल्लीत थंडीचा प्रभाव वाढू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

केरळ, तामिळनाडू आणि बंगालमध्ये पावसाची शक्यता

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडू आणि बंगालमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. याशिवाय आज ओडिशा आणि केरळच्या उत्तर किनारपट्टीवरही पाऊस पडू शकतो.

डोंगराळ भागात बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली

उत्तराखंडमध्ये केदारनाथ-बद्रीनाथसह पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली आहे. पुढील काही दिवस उत्तराखंडमध्ये हवामान कोरडे राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. याशिवाय पश्चिम हिमालयात हलक्या पावसाचा अंदाज IMD ने वर्तवला आहे.

यूपी-बिहारसह इतर राज्यांमध्ये हवामानाची स्थिती कशी असेल?

त्याचवेळी, हवामान खात्याने यूपी-बिहारच्या हवामानाचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसांत उत्तर प्रदेशात थंडीचा जोर वाढणार असून सकाळ-संध्याकाळ सौम्य थंडी कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. बिहारमध्येही अशीच परिस्थिती राहील, असे आयएमडीने म्हटले आहे.

हेही वाचा

Nashik News : रेल्वेत प्रवाशाकडे मिळाले ६१ लाख, ८ तोळे सोने

आम्‍हाला पॅलेस्टाईनमधील निष्पाप लोकांची काळजी : UN सुरक्षा परिषदेत भारताची स्‍पष्‍टोक्‍ती

Maratha Reservation | जरांगे-पाटील यांनी उपोषणाला बसून उपयोग नाही : गिरीश महाजन

Back to top button