Nashik News : रेल्वेत प्रवाशाकडे मिळाले ६१ लाख, ८ तोळे सोने | पुढारी

Nashik News : रेल्वेत प्रवाशाकडे मिळाले ६१ लाख, ८ तोळे सोने

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; कोलकोता येथून मुंबईकडे जाणाऱ्या हावडा एक्सप्रेसमधून रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ)ने एका प्रवाशाला पकडून त्याच्याकडून तब्बल ६१ लाख ३९ हजार रोख रकमेसह आठ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. हरिश्चंद्र खंडू वरखडे (वय ६४, रा. देऊळ अली, जि. सातारा) असे या प्रवाशाचे नाव आहे. आरपीएफने वरखडे यास आयकर विभागातील अधिकाऱ्यांच्या हवाली केले असून, एवढी मोठी रक्कम प्रवाशाकडे कशी आली याची चौकशी केली जात आहे.

आरपीएफचे अधिकारी संदिप देशवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२८१० अप हावडा एक्सप्रेस या गाडीने उतरलेल्या एका प्रवाशावर संशय आल्यानंतर ड्यूटीवर असलेल्या आरपीएफ जवानाने वरखडे यांची चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्याच्या बॅगची झाडाझडती घेतली असता, त्यात ६१ लाख ३९ हजार रोख रकमेसह ९ तोळ्याचे सोन्याचे दागिने आढळून आले. रकमेबाबतही प्रवाशाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आरपीएफने आयकर विभागाच्या ताब्यात दिले. संशयित हा जळगाव येथून हावडा एक्सप्रेसद्वारे मुंबईला जात होता. इतकी मोठी रक्कम या व्यक्तीकडे कुठून आली, मुंबईला कोणाला देण्यासाठी जात होता, ही रक्कम हवालाची तर नाही ना याचा तपास आता आयकर विभागाकडून केला जात आहे.

हेही वाचा :

Back to top button