काँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचाराचे ‘एटीएम’ : भाजपचे टीकास्त्र | पुढारी

काँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचाराचे 'एटीएम’ : भाजपचे टीकास्त्र

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू झाली आहे. कर्नाटक सरकारमधील काँग्रेसचे मंत्री शिवानंद पाटील यांच्यावर तेलंगणा राज्यात नोटा उधळल्याच्या चित्रफितीचा दाखला देत भाजपने “काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाराचे एटीएम आहे,” अशी सणसणीत टीका केली आहे. ( BJP Hits Back At Congress Leader )

भाजपचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी आज (दि.१८) पक्ष मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराच्या मुद्दयावरून शरसंधान केले. कर्नाटक सरकारमधील काँग्रेसचे मंत्री शिवानंद पाटील यांच्यावर तेलंगणा राज्यात नोटा उधळल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. राजस्थानमध्ये काँग्रेस आमदार राजेंद्रसिंग बिधुरी यांनी एका व्यक्तीला त्याच्या राजस्थानी पगडीवर लाथ मारून हाकलले होते, याचा दाखला देत गौरव भाटीया म्हणाले, की काँग्रेसला भ्रष्टाचार करायची सवय आहे, काँग्रेसने सर्वसामान्य लोकांच्या पैशासह राजस्थानच्या अस्मितेचा खेळ मांडला आहे, काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी हे देखील भ्रष्टाचाराच्या आरोपात जामिनावर बाहेर आहेत, या सगळ्या गोष्टींची उत्तरे जनता मतदानाच्या माध्यमातून देईल, असाही हल्ला प्रवक्ते गौरव भाटीया यांनी चढवला.

हेही वाचा :

 

 

Back to top button