‘शरद पवार पंतप्रधान नाहीत’ : अदानी- पवार मैत्रीवर राहुल गांधी स्पष्टच बोलले | Rahul Gandhi on Pawar-Adani friendship | पुढारी

'शरद पवार पंतप्रधान नाहीत' : अदानी- पवार मैत्रीवर राहुल गांधी स्पष्टच बोलले | Rahul Gandhi on Pawar-Adani friendship

Rahul Gandhi on Pawar-Adani friendship : 'शरद पवार अदानींचा बचाव करत नाहीत'

पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार हे काही देशाचे पंतप्रधान नाहीत, तसेच ते कोणाला जबाबदार नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यातील मैत्रीवर मत व्यक्त केले. अदानी-पवार मैत्री या मुद्द्याचे महत्त्व एक प्रकारे कमी करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला. (Rahul Gandhi on Pawar-Adani friendship)

युरोपमधील Financial Times या वृत्तपत्राने अदानी भारताला महागात कोळसा पुरवतात असा आरोप केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. जेव्हा आपण घरात पंखा लावतो, स्वीच ऑन करतो, तेव्हा पैसे अदानी यांच्या खिशात जात असतात अशी टीका त्यांनी केली. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते शरद पवार आणि अदानी यांच्या मैत्रीवर प्रश्न विचारण्यात आले. तसेच शरद पवार आणि अदानी यांच्यात वारंवार भेट होत असल्याचेही पत्रकारांनी सांगितले.

यावर राहुल गांधी म्हणाले, “शरद पवार हे गौतम अदानींचे संरक्षण करत नाहीत. मी याबद्दल शरद पवारांना काहीही विचारलेले नाही. कारण शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत. जर ते देशाच्या पंतप्रधानपदावर असते आणि अदानींचे संरक्षण करत असते तर त्यांना प्रश्न विचारला असता. शरद पवार हे कोणलाही जबाबदार नाहीत.”

शरद पवार-अदानी भेटी Rahul Gandhi on Pawar-Adani friendship

एप्रिल महिन्यात अदानी यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओक निवास्थानी भेट घेतली होती. या बैठकीनंतर पवारांनी अदानींचे खुलेपणाने समर्थन केले होते. त्या वेळी हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी यांच्यावर चौफेर टीका होत होती. काँग्रेस आणि इतर मित्रपक्ष अदानी यांच्या संसदीय समितीच्यावतीने चौकशीची मागणी करत होते, त्या वेळी शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशीची मागणी केली होती. अदानी यांनी जून महिन्यात पुन्हा पवारांची भेट घेतली. पवार आणि अदानी यांच्यात गेली दोन दशके मैत्रिपूर्ण संबंध आहेत. लोक माझे सांगाती, या त्यांच्या चरित्रात अदानी यांची स्तुती करण्यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button