स्वीस बँकातील खातेदारांची माहिती केंद्र सरकारच्या ताब्यात | पुढारी

स्वीस बँकातील खातेदारांची माहिती केंद्र सरकारच्या ताब्यात

नवी दिल्ली /बर्न;  पीटीआय :  स्वीस बँकांत पैसे ठेवलेल्या खातेदारांच्या नावाच्या यादीचा पाचवा सेट स्वित्झर्लंडने भारताला दिला आहे. उभय देशांतील करारानुसार भारताला खातेदारांची माहिती देण्यात आहे. मनी लाँडरिंगसह टेरर फंडिंगची पाळेमुळे शोधण्यास याचा उपयोग होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वार्षिक स्वयंचलित माहितीचे आदान-प्रदान या अंतर्गत स्वित्झर्लंड सरकारने भारतीय खातेदारांच्या नावाची यादी भारताला दिली आहे. यामध्ये काही भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे. जगातील 104 देशातील 36 लाख खातेदारांची माहिती संबंधित देशांना स्वित्झर्लंडकडून देण्यात आली आहे. भारताला याआधी चार सेट देण्यात आले आहेत. हा पाचवा सेट असून पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात सहावा सेट देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वीस बँकेत पैसे ठेवलेल्यांचे नाव, पत्ता, ओळखपत्र, टॅक्स आययडेंटीफिकेशन नंबर, अकाऊंट बॅलन्स, कॅपिटल इन्कम आदींची माहिती देण्यात आली आहे. संबंधित खातेदारांच्या रकमेबाबत गोपनीयता ठेवण्यात आली आहे. तथापि मनी लाँडरिंग आणि टेरर फंडिंगसंदर्भातील संशयास्पद व्यवहार आढल्यास स्वित्झर्लंड सरकारकडून संबंधित खातेदाराबद्दल तपशिलात माहिती दिली जाते. गेल्या महिन्यात भारतातील शेकडो खातेदारांची माहिती केंद्र सरकारला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Back to top button