Jammu-Kashmir: अनंतनागमध्ये वाहनात स्फोट; ८ मजूर जखमी | पुढारी

Jammu-Kashmir: अनंतनागमध्ये वाहनात स्फोट; ८ मजूर जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : काश्मीरमधील अनंतनागच्या लारकीपोरामध्ये एका वाहनात आज (दि. २७) स्फोट झाला. या स्फोटात ८ मजूर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सिमेंट मिक्स सेंटरिंग व्हायब्रेशन मशीनमध्ये हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वाहनात पोर्टेबल जनरेटर आणि तेलाचा डबाही होता. फॉरेन्सिक टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. (Jammu-Kashmir)

सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून स्फोटाच्या कारणाचा तपास सुरू केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, टाटा मोबाईल वाहनातून (JK18-4476) लारकीपोरा दुरू येथून मजूर जात होते. लारकीपोरा येथे अचानक गाडीच्या आत स्फोट झाला आणि त्यात आठ मजूर जखमी झाले.

स्फोटाची माहिती मिळताच सुरक्षा दल आणि आसपासच्या परिसरात गस्त घालणारे पोलीसही घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी त्यांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि स्थानिक लोकांच्या मदतीने जखमी कामगारांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जखमी मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमी झालेले सर्व मजूर गैर-काश्मीरी असून ते देशातील इतर राज्यातील आहेत. स्फोटात वाहनाचेही नुकसान झाले आहे. कामगारांच्या वाहनासोबत असलेल्या सिमेंट मिक्स सेंटरिंग व्हायब्रेशन मशीनमध्ये हा स्फोट झाल्याचे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. फॉरेन्सिक तपास पथकाने घटनास्थळावरून काही नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

हेही वाचा 

Back to top button