VK Singh on POK : …वाट पाहा, POK स्वतःच भारतात सामील होईल | पुढारी

VK Singh on POK : ...वाट पाहा, POK स्वतःच भारतात सामील होईल

पुढारी ऑनलाइन डेस्क : VK Singh on POK : केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांचे विधान मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फक्त वाट पाहा, POK स्वतःहून भारतात सामील होईल, असे त्यांनी म्हटले आहे. राजस्थान येथील एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी हे विधान केले आहे. त्यांनी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांवरही यावेळी निशाणा साधला. POK तील लोकांनी स्वतःला भारतात सामील होण्याची मागणी केली होती. यावर प्रश्न विचारला असताना व्ही के सिंह यांनी प्रतिक्रिया दिली.

VK Singh on POK : परिवर्तन संकल्प यात्रा

राजस्थानमध्ये भाजपने परिवर्तन संकल्प यात्रा काढली आहे. याबाबत सिंग म्हणाले की, राजस्थानातील जनता काँग्रेस सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्थेची बिकट परिस्थिती, तरुण आणि शेतकऱ्यांना दिलेली वचने पाळलेली नाही. त्यामुळे भाजप जनतेत जाऊन त्यांचे म्हणणे ऐकत आहे. आमच्या संकल्प यात्रेला नागरिक साथ देत आहेत.

VK Singh on POK : प्रियांका बालीश आणि अपरिपक्व

सिंग यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला. प्रियांका गांधी बालीश आणि अपरिपक्व आहेत, असे ते म्हणाले. जनतेला मोठमोठी आश्वासने देऊन काँग्रेस राज्यात सत्तेवर आले. मात्र, त्यांनी जनतेला आश्वासने वेगळी दिली आणि केले दुसरेच, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यात 17 वेळा पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. कष्टकरी लोक राजस्थानमध्ये राहतात आणि जेव्हा पेपर फुटतो तेव्हा त्यांना सर्वात जास्त वेदना होतात. देशातील सर्वात महाग वीज राजस्थानमध्ये आहे.

VK Singh on POK : महिलांवरील अत्याचारात वाढ

राजस्थान एक विकसित राज्य आहे. मात्र, गेल्या साडेपाच वर्षात चोरी, लैंगिक शोषण, लुटमारीच्या घटना, पेपरफुटीच्या घटना, महिलांवरील अत्याचार यामध्ये वाढ झाली आहे. राज्यात परिवर्तन आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या सर्व योजना महिला, दलित आणि वंचितांसाठी आहेत. परिवर्तन संकल्प यात्रेने राज्यात परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार भाजपने केला आहे.

हे ही वाचा :

Back to top button