Closing Bell | सलग तिसऱ्या सत्रांत तेजी! सेन्सेक्स ६५,७०० पार, जाणून घ्या आजच्या ट्रेडिंगमध्ये काय घडलं? | पुढारी

Closing Bell | सलग तिसऱ्या सत्रांत तेजी! सेन्सेक्स ६५,७०० पार, जाणून घ्या आजच्या ट्रेडिंगमध्ये काय घडलं?

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीला विराम देईल या शक्यतेने आणि संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान आज सलग तिसऱ्या सत्रात भारतीय शेअर बाजारात तेजी राहिली. सेन्सेक्स आज १५२ अंकांनी वाढून ६५,७८० वर बंद झाला. तर निफ्टी ४६ अंकांच्या वाढीसह १९,५७४ वर स्थिरावला. क्षेत्रीय निर्देशांकांत बँकिंग स्टॉक्समध्ये किरकोळ घसरण दिसून आली. तर हेल्थकेअर आणि रिअल्टीमध्ये प्रत्येकी १ टक्के वाढ झाली. बीएसई मिडकॅप निर्देशांक १ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.६ टक्क्यांनी वाढला.

सेन्सेक्स आज ६५,६७१ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,८०९ पर्यंत वाढला. सेन्सेक्स सन फार्माचा शेअर टॉप गेनर होता. हा शेअर २ टक्के वाढून १,१३१ रुपयांवर पोहोचला. टायटन, आयटीसी, नेस्ले इंडिया, बजाज फायनान्स, एलटी, इन्फोसिस, कोटक बँक, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स हे शेअर्स आज वाढले. तर अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, मारुती हे शेअर्स सुमारे १ टक्क्याने घसरले. विप्रो, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड हे शेअर्सही घसरले.

निफ्टीवर अपोलो हॉस्पिटल, कोल इंडिया, सन फार्मा, बीपीसीएल, LTIMINDTREE हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर एसबीआय लाईफ, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ. रेड्डीजस हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले. (Stock Market Closing Bell)

नायकाचे शेअर्स वधारले

काउंटरवर ब्लॉक डील झाल्याच्या वृत्तातदरम्यान Nykaa चालवणाऱ्या एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्सचे शेअर्स (FSN E-Commerce Ventures Share Price) बीएसई (BSE) वर मंगळवारच्या इंट्राडे ट्रेडमध्ये ४ टक्के वाढून १४० वर पोहोचले. त्यानंतर हा शेअर १३६ रुपयांवर आला.

जागतिक बाजार

अमेरिकेतील शेअर बाजार काल सोमवारी सुट्टीमुळे बंद राहिला. तर आशियाई बाजारात आज घसरण दिसून आली. एमएससीआय एशिया एक्स-जपान निर्देशांक, चीनचा ब्लू चीप CSI 300 निर्देशांक, हाँगकाँगचा हँगसेंग हे निर्देशांक घसरले.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा जोर कायम

स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (Foreign institutional investors) सोमवारी ३,३६८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (domestic institutional investors) २,५६३ कोटी रुपयांचे शेअर्सची खरेदी केली.

 हे ही वाचा :

Back to top button