वेध शेअर बाजाराचा : अनुत्साही बाजारात पुन्हा आशेची लहर

वेध शेअर बाजाराचा : अनुत्साही बाजारात पुन्हा आशेची लहर
Published on
Updated on

मागील आठवड्याच्या बाजाराचे वर्णन मरगळलेला बाजार असे केले होते. गुरुवारी ऑगस्ट महिन्याचा अखेरचा दिवस असल्याने साप्ताहिक तसेच मासिक Expriy पार पडली. गेल्या महिन्याचे निर्देशांकाचे आकडे पाहिले तर पूर्ण महिनाभर बाजारावर ही मरगळ होती, हे दिसून येईल.

निफ्टी 50 – 19435.30 (-0.47%), सेन्सेक्स – 65387.16 (-0.60%), बँक निफ्टी – 44436.10 (-1.24%), S & P Global India manufacturing PMI ऑगस्ट महिन्यात अपेक्षेपेक्षा जास्त 58.6) वाढला. जीडीपीमधील 7.8 टक्के वाढ ही मागील तिमाहीपेक्षा (6.1 टक्के) अधिक हेाती. या दोन सकारात्मक बाबींमुळे गुंतवणूकदारांचे मनोबल उत्साहाचे होते. परंतु मान्सूनची सरासरी तूट वाढत चालल्यामुळे तसेच परदेशी गुंतवणूक संस्थांचा विक्रीचा मारा सुरूच राहिल्यामुळे एकूण खरेदीला चाप बसला.

इंडेक्स लेव्हलला बाजार अशा जवळजवळ जैसे थे परिस्थितीवर राहिला, तरी स्टॉक लेव्हलला खूप शेअर्सनी धूम मचायी! SKM Egg Products Export (India) Ltd या शेअरचे नाव तुम्ही कधी ऐकले आहे का? 31 जुलै 2023 ला या शेअरचा बंद भाव होता रु. 249.40 आणि शुक्रवारचा त्याचा बंद भाव आहे रु. 508.35! एका महिन्यात 104 टक्के वाढ म्हणजे दुप्पटीपेक्षा अधिक! एग पावडर, लिक्विड, एग आणि बेकरी प्रॉडक्टस हे तिचे प्रॉडक्टस् आहेत. तीन वर्षांची सरासरी विक्री वाढ 28 टक्के, नफा वाढ 153 टक्के, प्रती समभाग उत्पन्न (ROE) 26 टक्के अशी नेत्रदीपक आकडेवारी असल्यावर हा शेअर वाढला नसता तरच नवल ठरले असते.

दुसरा शेअर आहे DB Realty! रियल इस्टेट सेक्टरमधील ही कंपनी रेसिडेन्शिअल आणि कमर्शिअल इस्टेटस् डेव्हलप करते. 2010 मध्ये म्हणजे लिस्टिंगच्या वर्षात तिचा सार्वकालीन उच्चांकी भाव रु. 475.90 हा होता. परंतु त्यानंतर या शेअरने सलग घसरण अनुभवी ऑगस्ट 2020 पासून पुन्हा हा शेअर अपटेंडमध्ये आला. 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये कंपनी 36 कोटी रु. निव्वळ नफा कमवला. रेखा झुनझुनवालाकडे या कंपनीचा 1.21 टक्के भाग हिस्सा आहे. परदेशी संस्थांचाही 2 टक्के सहभाग आहे. गेल्या एक महिन्यात 86 टक्के हा शेअर वाढला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा हा संपूर्ण भारताच्या कॉपोरेट सेक्ट्ररचा औत्सुक्याचा विषय असतो. ती गेल्या महिन्यात पार पाडली. संपूर्ण भारतभर 5 नेटवर्कचे जाळे पसरणे आणि त्यासाठी जिओ एअरफायबरचे लाँचिंग करणे हा विषय प्रामुख्याने होता. पाठोपाठ नीता अंबानींचे संचालक मंडळामधून पायउतार होणे आणि इशा, आकाश, आणि अनंत अंबानी या नव्या पिढीचे मंचकारोहण होणे, याही गोष्टी घडून आल्या.

मारुती सुझुकीने 10000 चा टप्पा पार केला. शुक्रवारचा शेअरचा भाव होता रु. 10331. मार्च तिमाहीपेक्षा जून तिमाहीमध्ये FII सहभागही शेअरमध्ये वाढलेला आहे. दिवाळी पाडवा जवळ येईल तसा हा शेअर आणखी वाढेल. MRF चा शेअर जुलै महिन्यामध्ये लाखमोलाचा झाला. त्याची भाववाढ आस्ते आस्ते सुरूच आहे. बोनस शेअर्स, स्प्लिट, डिव्हिडंड या गोष्टींशी हा शेअर असाच फटकून वागत राहिला तर याचा भाव कोणत्या शिखरावर पोहोचेल. आज तरी तो 1,08,041 वर ट्रेड करतो आहे.

संपूर्ण महिना बाजार Flat राहिला असला तरी शुक्रवारी म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी निफ्टीने 181 पॉईंटसनी (0.94 टक्के) आणि सेन्सेक्सने 555 पॉईंटसनी (0.86 टक्के) वाढून जोरदार सलामी दिली आहे. सेन्सेक्सने 65000 च्या वर जाणे अगत्याचे होते. निफ्टीही पुन्हा 19500 च्या वर जाऊन थोडा तिथे स्थिरावला तर बाजारात पुन्हा एकदा तेजीची बहार येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news