Chandrayaan-3 मोहिमेचे ‘हे’ आहेत ‘शिल्‍पकार’, जाणून घ्‍या सविस्‍तर | पुढारी

Chandrayaan-3 मोहिमेचे 'हे' आहेत 'शिल्‍पकार', जाणून घ्‍या सविस्‍तर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थेने (इस्रो) आज इतिहास घडविला. चांद्रयान-३ मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते.चंद्राच्‍या दक्षिण ध्रुवावर प्रथम चांद्रयान उतरवणारा देश, अशी भारताची ओळख झाली आहे. या ऐतिहासिक यशाचे शिल्‍पकारांविषयी जाणून घेण्‍यास उत्सुक असाल. चला तर चांद्रयान-३ मोहिमेच्‍या शिल्‍पकारांविषयी जाणून घेवूया…

Chandrayaan-3 mission : इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ

भारताच्‍या महत्त्‍वाकांक्षी चांद्रयान-३ मोहिमेचे प्रमुख शिल्‍पकार हे भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थेचे (इस्रो) अध्‍यक्ष एस सोमनाथ यांना मानले जाते. त्‍यांनी जानेवारी २०२२ मध्‍ये संस्थेचा कार्यभार स्वीकारला होता. त्‍यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्‍हीएसएससी) आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे संचालक म्हणून काम केले. चांद्रयान-३ सोबतच आदित्य-एल१ ते सूर्य आणि गगनयान (भारताची पहिली मानव मोहीम) यासारख्या इतर महत्त्वाच्या मोहिमा त्यांच्या देखरेखीखाली आहेत.

प्रकल्प संचालक पी वीरामुथुवेल

पी वीरामुथुवेल हे २०१९ मध्‍ये चांद्रयान-3 प्रकल्पाचे संचालक झाले. वीरमुथुवेल हे तामिळनाडूमधील विल्लुपुरम येथील असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासचे (IIT-M) माजी विद्यार्थी आहेत. त्यापूर्वी त्यांनी इस्रोच्या मुख्य कार्यालयातील अंतराळ पायाभूत सुविधा कार्यक्रम कार्यालयात उपसंचालक म्हणून काम केले. भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेच्या मालिकेची दुसरी आवृत्ती असलेल्या चांद्रयान-2 मोहिमेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Chandrayaan-3 mission : एस उन्नीकृष्णन नायर

जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV) मार्क –III, ज्याचे नाव लाँच व्हेईकल मार्क-III, रॉकेट असे ठेवण्यात आले आहे, हे केरळच्या तिरुवनंतपुरममधील थुंबा येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने विकसित केले आहे. व्हीएसएससीचे प्रमुख असल्याने एस उन्नीकृष्णन नायर आणि त्यांची टीम महत्त्वपूर्ण मिशनच्या विविध प्रमुख कार्यांसाठी प्रभारी आहेत.

एम शंकरन

एम शंकरन हे यू आर राव उपग्रह केंद्र (URSC) चे संचालक आहेत. त्यांनी जून 2021 मध्ये आपल्‍या पदाचा कार्यभार
स्‍वीकारला होता. या केंद्रावर ISRO साठी भारतातील सर्व उपग्रह तयार करण्याची जबाबदारी आहे. दळणवळण, नेव्हिगेशन, रिमोट सेन्सिंग, हवामान अंदाज आणि इतर ग्रहांचा शोध घेण्‍यासाठी उपग्रह बनवणाऱ्या टीमचे मार्गदर्शक आहेत.

हेही वाचा : 

 

Back to top button