हिमाचल प्रदेशमधील भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा संख्‍या २१ वर | पुढारी

हिमाचल प्रदेशमधील भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा संख्‍या २१ वर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सिमल्याच्या समरहिल भागातील शिवमंदिरावर झालेल्या भूस्खलन घटनेतील मृतांचा आकडा २१ वर पोहोचला आहे. सोमवार १४ ऑगस्‍ट रोजी घडलेल्‍या नैसर्गिक आपत्तीमध्‍ये गेल्‍या दोन दिवसांमध्‍ये आणखी १२ मृतदेह मिळाले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. ( Shimla landslide )

सिमल्‍यातील समरहिल परिसरातील शिवमंदिरावर सोमवार १४ ऑगस्‍ट रोजी दरड कोसळली होती. याबाबत माहिती देताना जिल्‍हाधिकारी भानू गुप्‍ता म्‍हणाले की, स्‍थानिकांनी या दुर्घटते २१ जणांचा मृत्‍यू झाल्‍याची पुष्‍टी केली आहे. गेल्‍या दोन दिवसांपासून प्रशासनाने शोध मोहिमेत ढिगाऱ्याखालून १२ मृतदेह बाहेर काढले आहेत. शोध मोहिम आजही सुरु राहणार आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

आज ( दि.१६) सकाळी सहा वाजल्‍यापासून एनडीआरएफ, एसडीआरएफ, आर्मी, स्थानिक पोलीस आणि होमगार्डकर्मचार्‍यांनी पुन्‍हा एकदा शोधमोहिम राबवली. सकाळी एक मृतदेह बाहेर काढण्‍यात आला, अशी माहिती सिमल्‍याचे उपायुक्‍त आदित्‍य नेगी यांनी दिली. (Shimla landslide)

हेही वाचा: 

 

 

 

 

Back to top button